वचन:
स्तोत्र 135:13
हे परमेश्वरा तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.
निरीक्षण:
येथे महान राजा दाविद याने, सर्वशक्तिमान देवाची स्तुती आणि उपासना करताना सांगितले की, परमेश्वराचे नाव चिरकाल टिकते आणि त्याची ख्याती सर्व पिढ्यांपर्यंत चालते. लोकांनी आपल्या देवाचा शोध केला आहे किंवा नाही, दावीद येथे म्हणत आहे की मानवी इतिहासात असा काळ कधीच आला नाही की “आपला चिरकाल देव” ओळखला गेला नाही.
लागुकरण:
रोम 1:18-20 मध्ये प्रेषित पौल अगदी स्पष्टपणे सांगतो की मानवाच्या सुरुवातीपासून, देवाने नेहमीच मानवांना हे स्पष्ट केले आहे की तो (देव) आहे आणि तो शांत बसलेला नाही. शिवाय, मानवजातीने नेहमी आपल्या अंतःकरणात हे जाणले आहे की देव आपल्यासोबत उपस्थित आहे. खडक किंवा लाकडाचा तुकडा किंवा प्राणी नाही तर जिवंत, प्रेमळ देव, जो आपल्या प्रत्येकावर खरोखर प्रेम करतो. खरं तर, देवाने स्वत:ला अशा लोकांना प्रकट केले आहे जे त्याला शोधत नाहीत जेणकरून न्यायाच्या दिवशी त्यांना त्याचा शोध न घेण्याची कोणतीही सबब राहणार नाही. कारण त्याने यिर्मया 29:13-14 मध्ये अभिवचन दिले आहे की जेव्हा आपण त्याच्या शोधास लागू तेव्हा तो आपल्याला पावेल. तो एकच आणि एकमेव जिवंत आणि पराक्रमी देव आहे. म्हणून दाविद त्याला अशी हाक मारतो, “आमचा चिरकाल देव!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
आज मी तुझ्या उपस्थितीत नम्र होत आहे कारण मी पुन्हा एकदा तुझे नाव घेत आहे. संपूर्ण इतिहासात आणि आजच्या काळापर्यंत तुझ्यासारखा कोणीही नाही तू आदि व अंत आहेस, अल्फा व ओमेगा आहेस. प्रभू मला तुझ्यामध्ये राहण्यास मदत कर. आज आणि येणाऱ्या माझ्या उर्वरित दिवसांसाठी माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद. येशुच्या नावात आमेन.