वचन:
होशेय 3:3
मी तिला म्हणालो, “तू पुष्कळ दिवस माझ्याकरता स्वस्थ बसून राहा, जारकर्म करू नकोस, परपुरुषाची होऊ नकोस; मीही तुझ्याशी असाच वागेन.”.
निरीक्षण:
होशेला देवाने काही काळापुर्वी सांगितले होते की त्याला गोमर या वेश्येशी विवाह करायचा आहे. ती देवाचे लोक म्हणजे इस्त्राएलाच्या मार्गभ्रष्टतेचे आणि एकच खरा देव, यहोवा याला सतत सोडून जाण्याचे प्रतिनिधित्व करणार होती. तसे त्याने केले, आणि त्याला गोमरपासून मुले झाली आणि मग गोमर होशेला सोडून पुन्हा एकदा वेश्येचे जीवन जगण्यासाठी रस्त्यावर जाऊन बसली. थोड्याच समयात, देव होशेकडे येतो आणि म्हणतो, “तू रस्त्यावर जाऊन तुझ्या बायकोला शोधून तिला तुझ्याकडे परत आणावे अशी माझी इच्छा आहे. त्याने परमेश्वराची आज्ञा पाळली. देवाने त्याला तिला क्षमा करून पुढे सर्व सोडून देण्यास सांगितले होते. तो तिला म्हणाला की तिने वेश्या म्हणून जास्त काळ जीवन जगू नये तर तिने स्वतःला फक्त त्याच्या हाती द्यावे आणि तोही असेच करेल.
लागूकरण:
ही कथा “अकल्पनीय क्षमा” याबद्दल आहे. होशेला आपल्या भ्रष्ट पत्नीला त्याच्याकडे परत आणण्यासाठी काय काय करावे लागले याचा विचार करा. त्याने प्रभूची आज्ञा पाळण्यास सुरुवात केली आणि गोमर या प्रसिध्द वेश्याशी विवाह केला. त्यांना मुलं झाली, आणि सर्व वेळ ती रस्त्यावर परत कशी जाणार या गोष्टीचा प्रयत्न करत होती. शेवटी, ती तिचा पती होशेय यापासून मुक्त होऊन ती पूर्वीच्या मार्गावर परत जाते. आणि ती खऱ्या अर्थाने तिच्या पुर्वीच्या जीवनशैलीत पुन्हा अडकते. पण देव संदेष्ट्याला म्हणतो, “गोमेरला परत घेऊन जा म्हणजे मी इस्राएलास दाखवू शकेन की मी तिलाही परत घ्यायला तयार आहे.” निश्चितपणे, होशेय अजूनही देवाने त्याला मुळात जे करण्यास सांगितले होते त्या विचारात गुरफटलेला होता, आणि आता त्याच्या मुलांची आई, जी वेश्या म्हणून रस्त्यावर फिरत आहे, ती पुन्हा एकदा होशेचे, केवळ पृथ्वीवरील प्रेम होईल. त्याने तिचा मागोवा काढायचा आहे आणि तिला “घरी परत ये” असे म्हणायचे आहे. त्याने तसे केले आणि तिला स्वतःकडे परत आणले. परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुन्हा पुन्हा हेच केले आहे. आपण नेहमी चुकीच्या गोष्टींमध्ये पडतो आणि असे आपण सतत करतो. परंतू देव खुप दयाळू व कृपाळू आहे तो आपल्याला आपल्या पापांची क्षमा करतो आपल्याला केवळ आपल्या चुकीच्या गोष्टींपासून मागे फिरायचे आहे. तो क्षमा करणारा देव आहे. म्हणूनच मी त्यास “अकल्पनीय क्षमा” असे म्हणतो.
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी, माझा प्रभु आणि तारणहार म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू अनेक वेळा मी तुझ्या विरुध्द वागलो, बंडपणा केला परंतू तू माझ्यावर सतत प्रेम करत राहीला मला “अकल्पनीय क्षमा केली” कारण तू माझ्यावर प्रेम करतोस. प्रभू मला तुझ्याशी विश्वासू राहण्यास मदत कर. मला तुझ्यासोबत जीवन जगायचे आहे. तुला आवडेल असे चालायचे आहे. मला सहाय्य कर येशूच्या नावात आमेन.