वचन:
योहान 11:4
ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.”
निरीक्षण:
लाजर आणि त्याच्या दोन बहिणी, मरीया आणि मार्था हे येशूचे खूप प्रिय मित्र होते. शहराबाहेर असताना, येशूला बहिणींकडून कळाले की लाजर इतका आजारी आहे की तो मृत्यू जवळ आला आहे. जेव्हा येशूने ते ऐकले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “या आजाराचा शेवट मृत्यूमध्ये होणार नाही.” येशू ज्या ठिकाणी सेवा करत होता तेथे दोन दिवस अधिक काळ राहिला. लाजर मरण पावला हे येशूला माहीत होते, पण लाजर केवळ झोपला आहे हे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले. येशू आणि शिष्य आले तेव्हा लाजर खरोखर मेला होता आणि कबरेत ठेऊन त्याला चार दिवस झाला होते. येशू कबरेकडे गेला आणि ओरडून म्हणाला, “लाजार बाहेर ये!” तागाच्या वस्त्राने गुंडाळलेला लाजार मेलेल्यांतून उठला आणि लगेच बाहेर आला.
लागूकरण:
या कथेबद्दल मला पहिली गोष्ट सांगायची आहे की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुढे काय आहे हे येशूला माहीत आहे. दुसरी म्हणजे, येशू जीवन आणि मृत्यूकडे तुम्ही आणि मी पाहतो तसे पाहत नाही. त्याची कालमर्यादा आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. फक्त तुम्ही आणि मी काहीतरी विचार करत असू याचा अर्थ असा नाही की येशू पण तसाच विचार करत असेन. त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वरचे आहेत, आणि तो कधीही चिंता करत नाही. परमेश्वराशिवाय तुम्ही आणि मी कुठे असू?. कदाचित तुमच्यापैकी कोणीतरी मृत्यूला सामोरे जात असेल, आज तुम्हाला प्रभूच्या वचनाची गरज आहे. पण….”अद्याप तुमची वेळ आलेली नाही!” आज अधिक गोष्टीसाठी देवावर विश्वास ठेवा!
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या स्वतःच्या जीवनात तुझ्या उपचाराबद्दल तुझे आभार मानतो. आता मी माझ्या मित्र परीवारासाठी प्रार्थना करत आहे. प्रभू ते आपल्या जीवनात त्रस्त आहे त्यांना वाटते की आमच्या जीवनात अजून का शांती येत नाही किंवा ज्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत ते का होत नाही पर त्यांना आज कळव की अजून तुमची वेळ आली नाही!” प्रभू तू आपल्या वेळेत कार्य करतो आणि ते कार्य परीपुर्ण व अद्भुत असते म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवण्यास आम्हाला सहाय्य कर म्हणजे आम्ही तुझे गौरव पाहू. येशुच्या नावात आमेन.