“असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.”

“असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.”

“असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.”

वचन:

नीतिसुत्रे 18:24
जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.

निरीक्षण:

येथे आजवरचा सर्वात बुध्दीमान मनुष्य, शलमोन म्हणतो की जर आमच्याकडे अविश्वसनीय मित्र असतील तर कालांतराने, तुम्ही आणि मी अखेरीस एका गोंधळाच्या मध्यभागी सापडू. याउलट, शलमोनाने म्हटले की, “असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.” कदाचित तो आपला बाप दाविद आणि त्याचा मित्र योनाथान यांच्यामध्ये असलेल्या जवळच्या नातेसंबंधाबद्दल विचार करत असावा जे त्या वेळी इतिहासात पौराणिक होते. परंतु बहुतेक धर्मशास्त्रज्ञ आणि तुमच्या आणि माझ्यासारखे येशूचे अनुसरण करणारे असा विश्वास करतात की तो भविष्यातील मशीहा, अगदी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत होता.  “असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.”

लागूकरण:

मला भाऊ नव्हता. पण मला असे भाऊ माहीत आहेत जे एकमेकांच्या एवढे जवळ नव्हते. तरीही, जेव्हा तुम्ही बंधुप्रेमाबद्दल बोलता, तेव्हा ते सहसा अशा प्रकारच्या प्रेमाशी संबंधित असते जिथे मी माझ्या भावाबद्दल काही निंदनीय बोलू शकतो, परंतु जर कोणी असे निंदनीय बोलले तर मी माझ्या भावासाठी शेवटपर्यंत लढा देईन. येथे ज्ञानी शलमोन यापेक्षाही मोठ्या प्रेमाबद्दल बोलत आहे. तो अशा मित्राबद्दल बोलतो जो “आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.” जेव्हा तुम्ही खरोखर मागे हटता आणि मोठ्या संदर्भात या परिच्छेदाकडे पाहता, तेव्हा येशूपेक्षा शलमोन कोणाबद्दल बोलत असावा? किती वेळा तुम्हाला असे वाटले की तुम्ही एकटे आहात आणि तुमच्या जवळचे असे कोणीच नाही की तुम्ही त्यांना एक फोन करावा? परंतू मग, तुम्ही येशूकडे बघता आणि रडू लागता आणि त्याला म्हणता, “तू माझ्यासाठी इथे आहेस म्हणून तुझे आभार. जेव्हा माझ्याजवळ कोणीही नसते, जेव्हा मला सहाय्य करणारे कोणीही नसते, तेव्हा मी तुझ्याकडे पाहू शकतो, तुला हाक मारू शकतो. धन्यवाद परमेश्वरा, तू असा प्रभू आहेस जो, आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज मला आनंद वाटतो की मी कधीच एकटा नाही! तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. जेव्हा मला असे वाटते की इतर सर्वांनी मला सोडले आहे तेव्हा मी थांबतो आणि मला आठवते की माझा एक मित्र आहे जो भावापेक्षा जवळ आहे. जो प्रिय येशू आहे! मी तुझे आभार मानतो की जेव्हा कोणी नाही तेव्हा तू माझ्याजवळ आहेस! येशुच्या नावात आमेन.