“आनंदाने भरलेला मनुष्य”

"आनंदाने भरलेला मनुष्य"

“आनंदाने भरलेला मनुष्य”

वचन

2 शमुवेल 6:14
दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला.

निरीक्षण:

दावीद राजाची ही विलक्षण कथा आहे ज्यामध्ये वस्त्र काढून परमेश्वरासमोर पुर्ण आवेशाने नाचत होता. तो इतका उत्तेजित का झाला? देवाची उपस्थिती असलेला कराराचा कोश हस्तगत करण्यात आला होता आणि तो शत्रूच्या प्रदेशात होता. तथापि, दाविदाला त्यास यरुशलेमेस परत आणण्यास यश आले आणि म्हणून तो त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक दिवस होता. दाविद हा “आनंदाने भरलेला मनुष्य” होता!

लागूकरण:

तुमचे हृदय आनंदाने कशाने भरते? कदाचित होणाऱ्या विवाहाने भरत असावे. कदाचित लवकरच बाळ जन्मास येणार. कदाचित एखादी नवीन कार असावी जी तुम्ही खरेदी करणार आहात. कदाचित तुमचा मुलगा लवकरच महाविद्यालयातून पदवीधर होईल या सर्व गोष्टींनी कदाचित ह्रदय भरत असावे. परंतू, दाविद राजाला “आनंदाने भरलेला मनुष्य” बनविण्याच्या मागील गोष्ट म्हणजे परमेश्वराची उपस्थिती आता यरुशलेममध्ये पुन्हा घरी परतणार होती. दाविद हा देवाच्या मनासारखा मनुष्य होता. त्याचे परमेश्वरावर प्रेम होते. परमेश्वराने केलेल्या अद्भुत गोष्टी त्या समयी वेगळ्या पद्धतीने होत्या, परंतू दाविदासाठी ते खरे होते. या लागुकरणामध्ये आधी उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी एक दिवस मिटतील. परंतु परमेश्वराची उपस्थिती नेहमीच नवीन असते. माझ्यातील त्याची उपस्थिती मला नेहमी “आनंदाने भरलेला मनुष्य” बनविते!

प्रार्थना:

प्रिय येशू,

पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीने मी भारावून गेलो आहे. मला तुझ्यापेक्षा जास्त हवे असे वाटणारे काहीच नाही. चांगल्या आणि वाईट काळात मला तुझी गरज आहे. प्रभु, मला फक्त तुझी गरज आहे, मला प्रत्येक समयी तुझ्या हर्षाने भर आणि तुझ्याबद्दलचा आनंद माझ्या मनात सदोदित असू दे. येशूच्या नावात आमेन.