“आपण कल्पना करू शकता?”

"आपण कल्पना करू शकता?"

“आपण कल्पना करू शकता?”

वचन:

1 राजे11:9

शलमोनाचे मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला; त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते.

निरीक्षण:

हे बायबलमधील एक दुःखद वचन आहे. शलमोन, ज्याच्याकडे देवाने त्याच्या राज्यांचा अधिकार सोपवला होता, आता त्याच देवाने त्याचा तिरस्कार केला आहे. नेमके  काय झाल होते? शलमोन देवाने त्याला दिलेली स्वतःची क्षमता आणि बुद्धी याने तो इतका उन्मत पावला होता की त्याने परदेशातील शेकडो स्त्रियांशी विवाह केले आणि त्यांना त्यांच्या विधर्मी मूर्तींना इस्राएलामध्ये आणण्याची परवानगी दिली होती. खरं तर, अनेक प्रकरणांमध्ये, शलमोनाने या देवतांसाठी स्मारके आणि मंदिरे देखील बांधली होती असे दिसते. इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणाला, “तू मेल्यानंतर मी तुझ्या राज्याचे तुकडे करीन आणि तुझ्या बाप दावीद याच्यावरील माझ्या प्रेमापोटी एकच वंशाचा बचाव करीन. तो एक वंश तुझ्या वडिलांचा वारसा म्हणून राहील!” जेव्हा तुम्ही हे अचानक आलेले वळण याविषयी वाचता, तेव्हा तुमचे विचार करणे थांबते, याची गोष्टींची  “तुम्ही कल्पना करू शकता का?”

लागूकरण:

आता याच उताऱ्यात, देव म्हणतो, “मी तुझ्यावर रागावलो आहे, विशेषत: तुला दोनदा दर्शन दिल्यावर!” तसे करणे बरोबर आहे. “पुर्वीच्या चांगल्या दिवसांत”, जेव्हा शलमोन पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून होता, तेव्हा देवाने गिबोनमध्ये शलमोनाला दर्शन दिले तेव्हा त्याने राजा म्हणून आपला कारभार सुरू केला. मग मंदिराचे समर्पण झाल्यानंतर आणि परमेश्वराला त्यांच्या अवाढव्य भेटवस्तू अर्पण केल्यावर सर्व इस्राएलास असामान्य आनंदाचा पूर आला. देवाने पुन्हा शलमोनाला दर्शन दिले आणि त्याला विश्वासू राहण्याचा इशारा दिला. परंतु विश्वाच्या देवाच्या वैयक्तिक दर्शनानंतरही, शलमोनाने परदेशी देवतांची पूजा करण्यासाठी परमेश्वराकडे पाठ फिरवली. “आपण कल्पना करू शकता?”. निर्माणकर्त्याने एवढे प्रेम करून, आदर करून आणि एवढी कीर्ती वाढवून कोणीतरी देवाच्या गौरवापासून इतके दूर कसे पडू शकते की त्याने आता लाकडाने आणि दगडाने घडविलेल्या मुर्तींची पूजा करावी? आपण या समयी त्या पित्याने आणि प्रभू येशूने आपल्यावर केलेल्या त्या प्रेमाची आठवण करूया.

प्रार्थना:

प्रिय येशू,

माझ्या, सर्व लोकांमध्ये मी माझ्या आयुष्यातील सर्व दिवस तुझे अनुसरण करण्याचे वचन देतो. प्रभू आमचे मन उन्मत होऊ देऊ नकोस प्रत्येक परीक्षेतून आम्हास राख, आम्हाला तुझे ज्ञान दे जेणेकरून आम्ही तुझ्यामध्ये परीपुर्ण व्हावे. तुझ्या ओळखीसंबंधीचा आत्मा दे जेणेकरून आम्ही तुझ्या प्रीतीची नेहमी आठवण ठेवावी. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद येशुच्या नावात! आमेन.