वचन:
लूक 17:15
त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला;
निरीक्षण:
ही दहा कुष्ठरोग्यांची कहाणी आहे जे येशूकडे आले होते आणि दुरूनच मोठ मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी, आमच्यावर दया करा!” येशू त्यांना म्हणाला, “जा, स्वतःस याजकाला दाखवा.” एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग आहे की नाही आणि ती व्यक्ती कुष्ठरोगापासून मुक्त आहे की नाही हे फक्त त्या काळातील याजकच ठरवू शकत होते. म्हणून जाताना ते बरे झाले. वरील परिच्छेदात, बायबल म्हणते की त्यापैकी एकाने परत येऊन प्रभूचे आभार मानले.
लागूकरण:
बायबल आपल्याला सांगते की हा माणूस शोमरोनी होता. यहुदी लोकांसाठी, शोमरोनी लोक परदेशी मानले जात होते. येशूने त्या माणसाला पाहिले आणि त्याचे ऐकले आणि त्याला म्हणाला, “बरे होण्यास सांगणारे दहा नव्हते का, आणि “एकटाच” धन्यवाद देण्यासाठी परत आला, तो परदेशी आहे?” तुम्ही जवळजवळ प्रभुला असे म्हणताना ऐकू शकता, “तू माझी मस्करी करत आहेस का?” त्या दिवशी कुष्ठरोग होणे म्हणजे चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्यासारखे होते, म्हणजे भयानक परिस्थीत असणे. पण नऊ माणसे आप-आपल्या वाटेने निघून गेली जणू त्यांना काही झालेच नव्हते. खरे आहे, आपण सर्व मरणार आहोत. आपल्यापैकी बरेच जण आजारी पडतात आणि वाटेत बरे होतात, पण शेवटी आपण मरतो. या समयी तुम्हाला माझे प्रोत्साहन आहे की जेव्हा आपण बरे होतो, तेव्हा आपल्याला परमेश्वराचे आभार मानणे आणि त्याच्या नावाची स्तुती करणे आवश्यक आहे. कृतज्ञ अंतःकरण आजाराचे दिवस चांगले बनविते.
प्रार्थना:
प्रिय येशू,
खरंच या समयी, तू मला दिलेल्या इतर अनेक आशीर्वादांसह, चांगल्या आरोग्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. त्या दिवसांत मी आजारी होतो, मी नेहमी बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि आज माझी तब्येत चांगली आहे. मी खरोखर शिकलो आहे की कृतज्ञ हृदय आजारी दिवस देखील चांगले बनवते. येशुच्या नावात आमेन.