2 तीमथ्य 4:5
*एक पाळक असतो तो त्याच्या मंडळीसाठी राबराब राबतो, त्यांच्या सुखा दुखा:त त्याचा वाटा असतो.
राञी अपराञी काही दुखले तर पाळक आठवतो, राञी आपल्या लेकंराची बायकोची काळजी न करता तो मंडळीसाठी धावतो. मंडळीतील लेकरांपासुन मोठ्यापर्यंत सर्वांचे वाढदिवस त्याला माहीती असतात त्यांना तो आवर्जून त्या दिवशी फोन करून विश करतो, परंतू त्याच्या वाढदिवसाला कोणी माञ विश करत नसते…लग्न असो वेळेत हजर, वाढदिवस असो वेळेत हजर,प्रेतक्रीया वेळेत हजर, परंतू त्याच्या वेळेला कोणीही हजर नसते.. मंडळी रुसो फुगो त्यातील प्रत्येकांची समजुत तो काढतो माञ मनात दुख: असूनही चेहऱ्यावर कायम हासत असतो.
वर्षोंवर्ष अनेकांच्या कुटूंबासाठी राबून सहज लोक त्याला सोडून जातात. लोकांना स्वत:चा मान सन्मान असतो. पन पाळकांचा नसतो.. आतील दुख: तसेच ठेवून तो जिंवत देवाची सेवा करत असतो.
👉 या काळात सर्व खात पित आहेत लग्न करत आहेत लग्न करवून घेत आहेत ..परंतू कधी आपल्यासाठी दिवसराञ झटणाऱ्या पाळकाला कोणी विचारलय का?? पास्टर तुम्ही कसे आहात तुमचे लेकरे कसे आहेत
तो अन्नाचा पैशाचा भुकेला नाही तर तुमच्या आस्थेचा आहे….
देव त्याला कधी उपाशी ठेवणार नाही त्याची लेकरे कधी भिकेस लागणार नाहीत..
❤️परंतू कधी केव्हा……आठवतो का? आपल्याला आपला पाळक..म्हणून म्हटंले एक पाळक असतो..
तु जी सेवा दिली त्याबद्दल धन्यवाद येशू सर्व सेवंकाच्या गरजा भागव व तुझी प्रामाणीक सेवा घडू दे..आमेन