“कधी कधी ते तुमच्या DNA मध्ये असते!”

"कधी कधी ते तुमच्या DNA मध्ये असते!"

“कधी कधी ते तुमच्या DNA मध्ये असते!”

वचन:

1 इतिहास 20:7
त्याने इस्त्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.

निरीक्षण:

या उताऱ्यात इस्राएल लोकांची टिंगलटवाळी करताना पकडलेला माणूस दुसरा कोणी नसून बारा बोटे आणि बारा पायाची बोटे असलेला धिप्पाड पुरुष होता. आम्हाला माहित आहे की तो एक धिप्पाड पुरुष होता कारण तो गथ येथील रहिवासी होता, त्याच ठिकाणाहून गल्याथ देखील आला होता आणि तो धिप्पाड पुरुषांचा देश होता. त्याने इस्राएल लोकांना टोमणे मारले याखेरीज फारसे काही सांगितले जात नाही. त्याने असे केल्यावर शिमी, जो दावीदाचा भाऊ होता, त्याचा मुलगा योनाथान, याने त्याला ठार केले. हे तुम्हाला या वस्तुस्थितीकडे घेऊन जाते की “कधीकधी ते तुमच्या DNA मध्ये असते!”

लागूकरण:

याबद्दल काय म्हणायचे आहे, ते म्हणजे जेव्हा तुम्ही संकटात असता किंवा जेव्हा तुम्ही असामान्य आनंद अनुभवत असता, “कधी कधी ते तुमच्या DNA मध्ये असते!” शिमीचा मुलगा योनाथान याचा विचार करा. त्याला त्याचा काका दाविद राजा याची कहाणी माहीत असावी आणि त्याने काही वर्षांपूर्वी गल्याथास इस्त्राएल लोकांना टोमणे मारताना पाहिले असावे आणि दाविदाने आपल्या गोफणीने त्या गल्याथाला कसे मारले होते हे त्यास माहीत असावे. योनाथानाने कदाचित विचार केला, “ठीक आहे, ते माझ्या DNA मध्ये आहे! कोणताही धिप्पाड पुरुष कधीही माझ्या लोकांना टोमणे मारू शकणार नाही,” आणि मग त्याने त्याचा वध केला. आज तुम्ही कदाचित अशा गोष्टींशी लढत असाल ज्या गोष्टी ह्या कथे इतक्या चांगल्या नाहीत, आपल्या जीवनात आपण असेच कोणावर तरी रागावतो कोणाचा तरी हेवा करतो किंवा वाईट गोष्टींना आहारी जातो, कारण त्या आपल्या DNA मध्ये असतात, कारण आपला जन्म पापात झाला. वाईट गोष्टी आपण शिकत नाही तर त्या आपल्याकडून घडतात. परंतू चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये असतील तर त्याबद्दल उत्सव करा, पण जर काही चांगले नसेल तर, DNA मध्ये असलेल्या त्या वाईट गोष्ट आता थांबवा. कारण तुम्ही देवाचे मूल आहात आणि आपला DNA येशूने आपल्या रक्ताने बदलला आहे. जर आपण त्याच्यावर आपल्याला पापातून सोडविणार आणि तारणारा म्हणून विश्वास ठेवतो व त्याचा स्विकार करतो तर त्याने आपल्याला आपल्या सर्व पापातून शुध्द केले आहे. आपण आजच त्या शापाला मोडू शकता!  आपल्या बरोबर एखाद्यास घ्या व दोघे एकत्र येऊन प्रार्थना करा. मत्तय 18:19 या वचनावर दावा करा आणि म्हणा, येशू, आम्ही दोघे सहमत आहोत की आज आमच्या आयुष्यातील हा नकारात्मक  DNA नष्ट झाला आहे! मला विश्वास आहे की प्रभू तू आज तो शाप मोडून टाकला आहेस!

प्रार्थना:

प्रिय येशू.

आज मी माझ्या मित्रासह तुझ्याकडे प्रार्थना करत आहे, जो कदाचित नकारात्मक कौटुंबिक समस्येशी झुंजत आहे. प्रभू आम्हा दोघांना चांगल्या गोष्टींमध्ये चालण्यास मदत कर, कारण प्रभू आम्ही तुझ्या रक्ताने विकत घेतलेले आहोत आणि तुझ्या रक्ताने शुध्द असे झालो आहोत. आज तू आम्हास आमच्या सर्व शापापासून मुक्त केले आहेस म्हणून धन्यवाद, आमच्यात तुझा DNA आहे. आम्हाला तुझ्यामध्ये राहण्यास सहाय्य कर, येशूच्या नावात आमेन.