वचन:
2 करिंथ 8:7
तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आमच्यावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे.
निरीक्षण:
प्रेषित पौलाने ज्या मुत्सद्देगिरीने करिंथ येथील मंडळीला उदार होण्यासाठी प्रोत्साहित केले, ती भावनिक बुद्धिमत्तेची बाब आहे. त्याने त्या सर्व आश्चर्यकारक गोष्टींसाठी त्यांचे कौतुक केले ज्यासाठी ते ओळखले जात होते, परंतु नंतर तो म्हणाला, “केवळ आणखी एक गोष्ट,” कृपेच्या कार्यात उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करा.
लागूकरण:
प्रेषित पौलाने करिंथ येथील मंडळीचे अनेक उत्कृष्ट ख्रिस्ती लक्षणांबद्दल कौतुक केले होते जे त्याने पाहिले. त्यांनी विश्वासात उत्कृष्ट कामगिरी केली या वस्तुस्थितीबद्दल तो बोलत होता. विश्वासानेच नविन करारातील मंडळीची स्थापना झाली आणि आज तिची भरभराट होत आहे. मग तो म्हणाला की या तरुण मंडळीने भाषणात उत्कृष्ट कामगिरी केली होती, याचा अर्थ ते त्यांच्या विश्वासासाठी वाद घालण्यास तयार होते. मग तो म्हणाले की ते ज्ञानात उत्कृष्ट झाले आहेत. ज्ञानामुळे आपला विश्वास निर्माण होतो आणि आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी असते. पौल म्हणाला की तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि जसे आम्ही तुम्हाला प्रीती करावयास शिकवली आहे तसे तुम्ही प्रीती करता. मग तो म्हणतो, “केवळ आणखी एक गोष्ट,” तुम्ही तुमच्या उदारतेसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहात याची खात्री करा. असे होऊ शकते की करिंथ येथील मंडळी कंजूष असावी? याची शंका आहे. जर तुम्ही ख्रिस्ती मूलभूत गोष्टींमध्ये उत्कृष्ट होऊ शकत नाही तर तुम्ही उदार असु शकत नाही. पण त्याचे स्मरण ठेवणे आणि वचनाप्रमाणे चालणे नेहमीच चांगले असते!
प्रार्थना:
प्रिय येशू,
मला हे लक्षात ठेवण्यास सहाय्य कर की तुझ्या उदारतेने तू आम्हास पुरवठा करतोस. आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी आम्ही तुझा दैवी पुरवठा आहोत. हे कार्य करण्यास कधीही थांबू नये म्हणून मला सहाय्य कर. मला आध्यात्मिकरीत्या आपले अंत:करण स्वच्छ ठेवण्यास मदत कर. मला कृपेमध्ये उत्कृष्ट बनायचे आहे! येशूच्या नावात आमेन.