वचन:
1 शमूवेल 27:12
आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”
निरीक्षण:
शौल राजा असताना दावीदाचे जीवन इतके कठीण झाले होते की त्याने माका राजाचा मुलगा आखीश याच्या अधिपत्याखाली असलेल्या सिकलाग नावाच्या गावात जाऊन पलिष्ट्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दावीदाने आखीशाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले आणि तो शौलापासून सुरक्षित राहिला. दाविदास शत्रूमध्ये राहणारा इस्राएलाचा गुप्तहेर म्हटले जात असे. तो आखीशास इतका प्रिय वाटू लागला की आखीशाला वाटले की तो आयुष्यभर त्याचा सेवक होईल. परंतु तुम्हाला संपूर्ण कथा माहित असेल तर तुम्हाला कळेल की हे खरोखरच “एक खराब मूल्यांकन” होते.
लागूकरण:
दावीद कधीच आखीशाचा मित्र नव्हता. तो एक इस्राएली आणि सर्व पलिष्टी लोकांचा भयंकर शत्रू होता. पण तो खूप धूर्त होता आणि इस्राएलाचा आजवरचा सर्वात हुशार रणनीतीकार होता, कदाचित आजपर्यंत. बायबलमध्ये ही कथा वाचताना हसण्यासारखे आहे की दावीद जिंकत आहे. पण, यामुळे आपणास आपली विवेकबुद्धी तपासावी लागते. आपण आपल्या आत्म्याच्या शत्रूपासून सावध आहोत काय. आपण अशा दुष्ट लोकांबद्दल सावध आहोत काय जे मित्र असल्याचे भासवतात? प्रेषित पेत्राने बर्याच वर्षांनंतर लिहिले, “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणास गिळावे हे शोधत फिरतो.” (1 पेत्र 5:8) जर आपण सावध न राहिल्यास, आपल्याबद्दल दुष्ट हेतू असलेल्या व्यक्तीचे आपण “एक खराब मूल्यांकन” करू. तुमच्याबाबतीतही तसेच आहे. म्हणून आज विवेक बुध्दीसाठी प्रार्थना करा.
प्रार्थना:
प्रिय येशू
आम्ही आमचा दिवस तुझ्या प्रार्थेने सुरु करतो. सर्व शत्रूंविरुध्द आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात पुर्ण करण्याच्या आमच्या उद्देशाला अपयशी करणाऱ्या सर्वांविरुध्द हेच माझे कुंपण आहे. आम्हास रोज प्रार्थना करण्यास सहाय्य कर आणि चांगल्या विवेक बुध्दीने आम्हाला भर, जेणेकरून कोणत्याही शत्रूची आमच्याविरुध्द सरशी होणार नाही. आम्हास सहाय्य कर, येशूच्या नावात आमेन.