वचन:
लूक 5:26अ
तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले
निरीक्षण:
छताला उखरून एका खचाखच भरलेल्या घरात अर्धांगवायू झालेल्या आपल्या मित्राला चार जणांनी खाली उतरवल्याची ही कथा आहे. त्यांनी त्याला थेट येशूसमोर चटईच्या प्रत्येक कोपऱ्याला दोरीने पकडून खाली सोडले. येशूने प्रथम त्याला सांगितले की त्याच्या पापांची क्षमा झाली आहे. हे ऐकून धार्मिक पुढाऱ्यांना राग आला, म्हणून येशू म्हणाला, “उठ तुझी चटई उचल आणि चालू लाग.” तो मनुष्य लगेच उठला आणि चालू लागला. जेव्हा ते घडले तेव्हा बायबल आपल्याला, “चमत्कारांचे कारण” सांगते. हा चमत्कार पाहून लोकांनी “देवाची स्तुती केली!”
लागूकरण:
काहींना असे वाटेल की लोकांना येशूकडे आकर्षित करण्यासाठी देवाच्या हातून चमत्कार घडतात. हे एका बिंदूपर्यंत खरे असले तरी, पवित्र शास्त्र म्हणते की जर आपण येशूला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून सांगितले, तर “तो लोकांना स्वतःकडे आकर्षित करेल!” (योहान 12:32) इतरांचा असा विश्वास आहे की जर देवाने त्यांच्या मित्रासाठी चमत्कार केला तर कदाचित तो भविष्यात त्यांच्यासाठी चमत्कार करू शकेल. परंतु येशू काय करू शकतो याबद्दल नाही; हे त्याने आधीच केले आहे त्याबद्दल हे सत्य आहे. वधस्तंभावरील त्याचे बलिदान आणि त्यानंतरचे त्याचे मृत्युतून पुनरुत्थान आपल्याला खात्री देते की देवाला सर्व काही शक्य आहे. त्या दिवशी जेव्हा अर्धांगवायू झालेला मनुष्य जमिनीवर उतरला आणि चालू लागला तेव्हा लोक थांबले आणि देवाची स्तुती करू लागले. आपण विश्वातील एकमेव सत्य आणि जिवंत देवाची सेवा करतो, आणि असे काहीही नाही, पूर्णपणे काहीही नाही, जो तो करू शकत नाही! तर माझ्या मित्रा, तू सध्या जे करत आहेस ते थांबव आणि माझ्याबरोबर देवाची स्तुती कर! कारण ते “चमत्काराचे कारण!” आहे.
प्रार्थना:
प्रिय येशू,
आज या समयी, मी परमेश्वराची स्तुती करण्यास तयार आहे. तू माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी जे काही केले आहे ते दिवसभर तुझी प्रशंसा करुनही अपुरे राहीले. माझ्याकडे देण्यासारखे दुसरे काहीही नाही, परंतु जेव्हा तुझी प्रशंसा करण्याची वेळ येते तेव्हा मी कधीही अनिच्छुक होणार नाही. येशुच्या नावात आमेन.