“जास्तीत जास्त”

“जास्तीत जास्त”

“जास्तीत जास्त”

वचन:

इफिस 3:20
जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलिकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे,

निरीक्षण:

इफिस येथील मंडळीला हे पत्र लिहिणारा प्रेषित पौल, आपला तारणारा येशू याच्या विचाराने नेहमीच आकर्षित झाला. येथे त्याने मंडळीला सांगितले की आपला महान प्रभु तुमच्यामध्ये “जास्तीत जास्त” काही करू शकतो आणि आपण त्याबद्दल कधीही विचार किंवा कल्पना करू शकत नाही. “जास्तीत जास्त” या शब्दाने नेहमीच माझे लक्ष वेधून घेतले आहे. तो “जास्तीत जास्त” देणारा देव आहे.

लागूकरण:

आपल्या देवाने आपल्यासाठी आज काय करावे अशी आपली इच्छा आहे? तुम्ही एकटे आहात का? बायबल म्हणते की “एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो.” (स्तोत्र 68:6अ) आज तुम्ही निराश आहात का? बायबल म्हणते की तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.” (अनुवाद 31:8) तुम्ही आर्थिक नुकसानाशी लढत आहात का? बायबल सांगते घाईघाईने मिळविलेले धन क्षय पावते. परंतू जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृध्दी पावते.” (नीतिसुत्रे 13:11) या एवढ्या वर्षांमध्ये प्रभूचा अनुभव घेत असताना जाणवते की जेव्हा आपली काही गरज असते म्हणून आपण प्रार्थना करतो, तेव्हा प्रभू केवळ तेवढीच गरज भागवत नाही, तर आपल्याला त्यापेक्षा “अधिक” देतो, जे आपल्या कल्पनेपलीकडे असते.  आपला परमेश्वर आपल्याला “जास्तीत जास्त” देणारा परमेश्वर आहे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज मला प्रामाणिकपणे सांगायचे आहे, मला खरोखर “जास्तीत जास्त” हवे आहे. काही क्षण मला असे वाटते की प्रत्येक स्तरावर माझी लढण्याची क्षमता कमी होत आहे. या दिवसांमध्ये मला अधिक बळ दे. कारण तू जास्तीत जास्त देणारा देव आहे. माझा विश्वास आहे की तू माझ्याबरोबर आहेस व मला सामर्थ्य देत आहेस. येशूच्या नावात आमेन.