“तर्क करणारा देव”

“तर्क करणारा देव”

“तर्क करणारा देव”

वचन:

योना 4:11

तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?

निरीक्षण:

हे सर्वशक्तिमान देवाचे शब्द त्याचा संदेष्टा योना याच्यासाठी आहेत. योनाने निनवेला जाऊन देवाने सांगितलेला संदेश सांगण्याच्या देवाच्या आज्ञेचा नकार केला होता. योनाला निनवेचे लोक आवडले नाही आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिशेने जाणारे जहाज पकडले. त्या जहाजामध्ये झोपलेला असताना मोठे वादळ सुटले आणि योनाला समजले की हे वादळ त्याच्यामुळेच आले आहे. त्याने विचार केला की जर खलाश्यांनी त्याला नावेतून फेकून दिले नाही तर संपूर्ण जहाज आणि त्यातील लोक यांचा नाश होईल. त्यांनी त्याला समुद्रात फेकून दिले आणि एक मोठा मस्याने त्याला गिळले. तुम्ही याआधी ही कथा ऐकली असेल. माश्याच्या पोटात, त्याने आपला बचाव व्हावा म्हणून देवाचा धावा केला आणि देवाने माश्याला आज्ञा केल्यानंतर त्या माश्याने त्याला समुद्रकिनाऱ्यावर ओकून टाकले. मग त्याने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि निनवेला गेला. राजासह निनवेच्या संपूर्ण राष्ट्राने परमेश्वरासमोर पश्चात्ताप केला. त्यांचा नाश करण्याऐवजी देवाने त्यांचा बचाव केला. त्यामुळे योनाला राग आला. तो एका लहानशा टेकडीवर जाऊन बसला आणि उदास झाला. निनवेच्या लोकांनी पश्चात्ताप केल्यानंतर देवाने त्यांना ठार केले नाही याबद्दल तो क्रोधाविष्ट होता. देवाने मग सिध्द केले की तो “तर्क करणारा देव” आहे.

लागूकरण:

विश्वाचा देव एकदम लहान योनासारख्या संदेष्ट्यासोबत तर्क करतो याची तुम्ही कल्पना करू शकता का? येथे तो लहान बाळासारखा रडत आहे कारण देवाने ज्या लोकांचा तो तिरस्कार करत होता त्यांना ठार केले नाही. पण योनाला आवडेल त्याप्रमाणे देव क्षुद्रपणाचा व्यवहार करत नाही. परमेश्वर म्हणतो, “चला, या, आपण बुध्दीवाद करू (तर्क करू)” यशया 1:18अ  तेव्हा तो यशयाशी बोललेले वचन जगत होता.  तुमची संदिग्धता कितीही लहान वाटत असली तरी ती परमेश्वरासमोर आणण्यास अजिबात संकोच करू नका. मोठ्या गोष्टी आणि छोट्या गोष्टी हाताळण्यासाठी तो पुरेसा मोठा आणि महान आहे. कारण तो “तर्क करणारा देव” आहे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी माझ्या सर्व गरजा वेदीवर आणण्यास तू मला सक्षम केले आहे याबद्दल धन्यवाद. तुझ्या मदतीने, माझी आव्हाने माझ्या पध्दतीने मला न दिसली तरी मी तुझ्यावर कधीही नाराज होणार नाही. पण त्याच वेळी, मी नेहमी माझ्या सर्व गोष्टी तुझ्याजवळ तुझ्या वेदीवर आणीन. तू तुझ्या अभिवचनाचा देव आहेस हे तू सिद्ध केलेस. येशुच्या नावात आमेन.