वचन:
तीत 1:6
ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.
निरीक्षण:
प्रेषित पौलाने मंडळीमध्ये आदरणीय व्यक्ती म्हणून वडीलाबद्दल सांगितललेल आपण पाहतो. वडील ख्रिस्ती पवित्रता आणि शिस्तीचा नमुना आहे. त्याने आपल्या पत्नीशी शुद्ध आणि विश्वासू असावे आणि येशूवर प्रेम करणास आपल्या मुलांना शिकवावे.
लागूकरण:
आधुनिक काळात पुरुषांवर कधीच हल्ला होत नाही. आपल्या समाजात गैरहजर पिता, काम नसलेला पुरुष आणि समाजातील अनेक समस्यांचे कारण म्हणून त्यांची थट्टा केली जाते. काही देशांमध्ये, पुरुष पुन्हा युद्धाकडे वळले आहेत आणि त्यांचे पुरुषत्व पुन्हा स्थापित करण्यासाठी द्वेषाबद्दल सतत चर्चा केली जात आहे. येथे, पौल म्हणतो की पुरुषत्वाची पुनर्स्थापना मंडळीमध्ये झाली पाहिजे. पुरुषांना सन्माननीय पुरुष म्हणून नेमले पाहीजे, कारण ते येशू आणि त्यांच्या समुदायाची चांगली सेवा करतात. जेव्हा एखादा परमेश्वरावर प्रेम करण्यास लावणाऱ्या आणि आपल्या वैयक्तिक शिस्तीत मुलांना वाढविणाऱ्या पुरुषाला या जीवनात सन्मानित करणे आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा आता मंडळीमध्ये वडिलांची जास्त गरज आहे. ज्यामुळे हा प्रश्न येतो: “तुमचे वडील कोण आहेत?”
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी मी वडीलजनांसाठी प्रार्थना करतो. स्त्रिया आणि तरुण स्त्रियांना ख्रिस्ती पुरुषाची गरज आहे ज्यांना आदर्श म्हणून पाहिले जाऊ शकते आणि त्यांचा आदर केला जाऊ शकतो. कृपया आम्हाला आणखी वडील मिळून दे जे तुझ्या मंडळीत तुझ्या सेवेचे काम पाहतील आणि तुझ्या सेवेत कार्य करण्यास तुझ्या दासाला हातभार लावतील प्रभू अश्या वडील मंडळीस मंडळ्यांमध्ये जोडण्यास सहाय्य कर. येशुच्या नावात आमेन.