वचन:
1 राजे 17:24
ती स्त्री एलीयास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहां आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मल आता कळून आले.”
निरीक्षण:
ही सारफथची तीच स्त्री आहे जी आपल्या मुलासोबत शेवटचे भोजन करणार होती आणि नंतर मरणार होती. याच अध्यायाच्या 12 वचनात तिचे हे स्वतःचे शब्द होते. तिने हे शब्द बोलले होते कारण एलीया मदतीसाठी तिच्या दारात आला होता. त्याने तिच्याकडे भाकर आणि पाणी मागितले होते. तेव्हा एलीया म्हणाला, “जा आणि मी सांगतो तसे कर. माझ्यासाठी एक भाकर भाज आणि एक तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी भाज. जर तू असे केले तर देव जमिनीवर पाऊस पाडेपर्यंत तुझ्या घरातील पीठाचे मडके आणि तेलाची कुप्पी कधीच आटणार नाही. संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे तिने केले आणि त्याचे वचन पूर्ण झाले. या महान चमत्कारानंतर काही वेळाने, तिचा मुलगा मरण पावला आणि ती एलीयाकडे धावत आली आणि म्हणाली, “आपला माझा काय संबंध? तुम्ही मला माझ्या पापाची आठवण करून देण्यासाठी आणि माझ्या मुलाला मारण्यासाठी आला आहात का?” एलीयाने त्या मुलाला त्याच्या खोलीत नेले, तीन वेळा त्याच्यावर पाखर घातली व देवाचा धावा करून म्हटले “परमेश्वरा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्याठायी पुर्ववत येऊ दे”. परमेश्वराने एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालाकाचा प्राण त्याच्या ठायी पुर्ववत येऊन तो पुनरपि जिवंत झाला. तेव्हा एलीयाने मुलाला त्याच्या आईकडे दिले तेव्हा ती म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहां आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”
लागूकरण:
जेव्हाही मी ही कथा वाचतो तेव्हा मला नेहमी त्या बाईला म्हणावेसे वाटते, जणू काही मी त्यांच्यासोबत उभा आहे, “तुला या वेळी खरोखर खात्री आहे का?” म्हणजे, या संदेष्ट्याच्या तोंडून, देवाने आधीच तिचा आणि तिच्या मुलाचा उपासमार होण्यापासून बचाव केला होता. त्याने अगोदरच पीठाचे मडके व तेलाची कुप्पी याविषयी भविष्यवाणी केली होती की पुन्हा पाऊस पडेपर्यंत ते आटणार नाही. त्या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या होत्या, परंतु जेव्हा तुम्ही हे विधान ऐकता तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवाने एलीयाच्या भविष्यसूचक शब्दाद्वारे आधीच काय केले आहे ते तिला आठवत असेल का. मी तुम्हाला विनंती करतो, या समयी, या स्त्रीसारखे होऊ नका. जर तो मुलगा मेला असता, तरी देव अजूनही देवच राहिला असता आणि एलीया त्या तासासाठी देवाचा प्रवक्ताच राहीला असता. जर तुम्ही देवाचे पुरुष किंवा स्त्री असाल, तर तुम्ही कोण आहात हे मान्य करण्यासाठी तुम्हाला या स्त्रीसारख्या संशयास्पद व्यक्तीची वाट पाहण्याची गरज नाही. देवाबरोबर जा. माणसाची मान्यता मिळो अथवा न येवो पण देवाच्या पाचारणात दृढ राहा.
प्रार्थना:
प्रिय येशू,
माझ्या आयुष्यात असे अनेक वेळा झाले आहे जेव्हा मला माहित होते की मी तुझा आवाज ऐकला आहे. पण काही मित्रांना वाटले की मी मूर्ख आहे. मला आनंद होतो की मी माणसाच्या मान्यतेऐवजी तुमच्या पाचारणावर उभा होतो. मला तुझ्या पाचारणामध्ये टिकून राहण्यास मदत कर. येशुच्या नावात आमेन.