“तुम्ही कल्पना करू शकता का?

“तुम्ही कल्पना करू शकता का?

“तुम्ही कल्पना करू शकता का?

वचन:

लूक 4:21
मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”

निरीक्षण:

येशूची चाळीस दिवस आणि चाळीस रात्री अरण्यात शत्रूनी परीक्षा घेतली होती. देवाच्या लिखित शब्दाच्या मदतीने ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, सैतानाने त्याला सोडले. त्याचा पुढचा मुक्काम नासरेथला घरी परतण्याचा होता. सभास्थानात प्रवेश केल्यावर, लोकसमुदाय त्याचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक होते. सुमारे 700 वर्षांपूर्वी लिहिलेल्या यशया 61:1,2 मधील उतारा वाचून तो सभास्थानात बसला आणि तेथे जमलेल्या लोकांकडे पाहिले आणि म्हणाला, ” हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”

लागूकरण:

“तुम्ही कल्पना करू शकता का,” त्या दिवसात मंदिरात श्रोत्यांपैकी एक असलेला, तरुण येशु जेव्हा म्हणतो की तो यशयाच्या 700 वर्षे जुन्या भविष्यवाणीचे उत्तर आहे? मजकुराच्या खाली काही वचनात, येशू म्हणाला, “कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही!” परंतु मी हा उतारा संदर्भामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मला खात्री नाही की मी त्या दिवशी त्या मंदिरात बसलो असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवला असता. योहान, सुवार्तेचा लेखक, म्हणाला, “जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.” तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेजाऱ्यावर इतके प्रभावित कसे होऊ शकता की तुम्ही म्हणू शकता, “तुम्हाला माहित आहे की तो देवाचा पुत्र आहे यावर माझा विश्वास आहे?” नक्कीच लोक चुकीचे होते, परंतु त्या दिवशी “तुम्ही कल्पना करू शकता”? त्यांनी त्याच्यावर प्रेम केले, त्याने जिंकावे अशी त्यांची इच्छा होती, पण देवाचा पुत्र? या समयी हे  शब्द लक्षात ठेवा. जर ते तेव्हा होते किंवा आता आहे, तरीही येशूला देवाचा पुत्र म्हणून स्वीकारण्यासाठी विश्वास लागतो. योहानाकडे परत, जो सुवार्तेचा लेखक, त्याने आपले वचन मी आधी लिहिलेल्या उताऱ्यात चालू ठेवले आणि असे म्हणत बंद केले, “परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; (योहान 1:12) अशा भेटीची “तुम्ही कल्पना करू शकता का?

प्रार्थना:

प्रिय येशू,

तू जिवंत देवाचा पुत्र आहेस यावर मी अनेक वर्षांपूर्वी विश्वास ठेवला. तेव्हाच मी तुला माझा वैयक्तिक प्रभु आणि तारणहार म्हणून स्वीकारले. खरंच, मला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे. प्रभू माझ्या आप्तजनांत आणि माझ्या मित्रमंडळीत ही सत्य वार्ता सांगण्यास मला मदत कर व त्यांना देखील तुझ्या तारणाचा अनुभव येऊ दे. येशुच्या नावात आमेन.