वचन:
मत्तय 12:34
अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.
निरीक्षण:
शब्बाथ दिवशी खरोखरच चांगल्या गोष्टी करण्याची येशूची प्रवृत्ती होती आणि यामुळेच तो नेहमी परुशांसोबत अडचणीत येत असे. या प्रसंगी, त्याने शब्बाथ दिवशी एका मनुष्याला बरे केले होते, आणि म्हणून परुश्यांनी असा दावा केला की त्याने नियमशास्त्राचे उल्लंघन केले. सापांच्या पिल्लांनो जे सत्य बोलत नाही असे म्हणून त्याने त्यांना संबोधले. तो म्हणाला, जे अंतकरणात भरले आहे तेच तोंडावाटे निघते. जेव्हा तुम्ही परुश्यांच्या संपूर्ण ढोंगीपणाचा विचार करता तेव्हा हे स्पष्ट होते की “ते त्याने भरलेले होते!”
लागूकरण:
आपल्या तोंडून जे काही बाहेर पडते ते आपल्या अंतःकरणात काय आहे यास दर्शविते. दाविद राजाने देवाची प्रार्थना केली आणि त्याला म्हणाला हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव. (स्तोत्र 139:23,24) दाविद पापी होता, पण तो देवाच्या मनासारखा मनुष्य देखील होता. आपणाला “पापी” या भागावर कमी भर देऊन असेच बनायचे आहे. आपण दररोज परमेश्वराला म्हणावे की, “माझी झडती घे! तुला नापसंत असणारे माझ्या अंतकरणात काही असेल ते काढून टाक. कारण मला अशा वाईट गोष्टींनी भरून जायचे नाही. माझ्या देवा, मला खरोखर तुला संतुष्ट करायचे आहे. निश्चितपणे, मला दुष्टपणाच्या गोष्टींमध्ये “पूर्ण” व्हायचे नाही! तर मला तुझ्या आत्म्याने भरायचे आहे, आज ठरवा की आपल्यामध्ये, येशू उंच व्हावा आणि आपण कमी व्हावे!
प्रार्थना:
प्रिय येशू
जेव्हा आम्ही परुशांची कथा वाचतो, तेव्हा हे पाहणे सोपे होते की, “ते त्याने भरलेले होते! मला त्या प्रकारचा व्यक्ती व्हायचे नाही. मला मदत कर की मी तुझ्या वचनांनी तुझ्या पवित्र आत्म्याने भरावे व माझ्या अंतकरणातून तुझी प्रिती, शांती, चांगुलपणा ही आत्म्याची फळे दिसून यावीत. प्रभू मला तुझ्यामध्ये राहण्यास व येशूला माझा जिवनाचा प्रभू करण्यास सहाय्य कर. येशूच्या नावात आमेन.