“ते माझ्या संदेष्ट्याला मूर्ख असे म्हणतात.”

“ते माझ्या संदेष्ट्याला मूर्ख असे म्हणतात.”

“ते माझ्या संदेष्ट्याला मूर्ख असे म्हणतात.”

वचन:

होशेय 9:7ब
तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.

निरीक्षण:

होशेय हा देवाचा संदेष्टा होता, जो इस्राएलाच्या मुलांनी त्याच्या पहिल्या प्रेमाकडे परत यावे अशी त्याची किती इच्छा आहे याचे देवाने दिलेले जिवंत उदाहरण होता. खरे सांगायचे तर, याच पुस्तकाच्या अकराव्या अध्यायात, देव स्वतःच्या क्रोधापासून मागे फिरतो आणि म्हणतो, माझे हृदय तुझ्याप्रती बदलले आहे. माझी करुणा जागृत झाली आहे, मी तुला नष्ट करणार नाही. मी तुझ्याविरुद्ध माझ्या क्रोधावेशाने येणार नाही.” पण, इथेच, त्याने इस्त्राएलास पाठवलेल्या संदेष्ट्याला अशा प्रकारची तिरस्काराची वागणूक दिली जाते या वास्तविकतेमुळे तो अजूनही क्रोधाविष्ट आहे. तो म्हणाला, “ते माझ्या संदेष्ट्याला मूर्ख असे म्हणतात.”

लागूकरण:

फक्त एका क्षणासाठी, मी तुम्हाला स्वतःला देवाच्या शूजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगणार आहे. त्याने आपल्या अभिषिक्‍त संदेष्ट्यांना इस्राएलास इशारा देण्यासाठी पाठवले की जर ते बदलले नाही तर त्यांचा नाश होईल.  आणि त्यांच्या मार्गावर येणाऱ्‍या संकटाबद्दल देवाचा इशारा घेऊन येणाऱ्या देवाच्या वाणीचा आदर करण्याऐवजी, त्यांनी देवाच्या या वचनांना मूर्ख असल्यासारखे वागवले! कल्पना करा! देव हा विश्वाचा सर्वज्ञानी सार्वभौम देव आहे आणि त्याला इस्राएल म्हणून ओळखल्या जाणार्‍या या “शेंगदाण्यासारख्या” लोकांशी सामना करावा लागला. हे मुर्ख लोक देवाच्या वचनांना “मूर्ख!” म्हणत होते. पण आमचे काय? आपल्या उच्चभ्रू राष्ट्राचे काय? मुद्रित आणि दूरचित्रवाणी माध्यमातील लोक दोष शोधत आहेत. देवाच्या पुरुष आणि स्त्री यांची निवड रद्द करण्याचे मार्ग शोधण्यासाठी प्रत्येक संधी शोधत नाहीत का? देवाच्या संदेष्ट्यांना “मूर्ख” म्हणत आपण इस्राएलासारखे आहोत असे दिसते. मला वाटतं, शेवटी, देव आपल्या राष्ट्रांनी पश्चात्ताप केल्यावर परत स्वीकारण्याचा मार्ग शोधून काढील. दरम्यान, आपण संदेष्ट्याच्या तोंडून आलेल्या शब्दांचा आदर केला पाहिजे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

या जगात जगत असताना आमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक आवाहानास सामोरे जाण्यास आम्हाला सामर्थ्य दे. जेव्हा लोक तुझे संदेष्ट्ये काय सांगतात ते ऐकत नाही तेव्हा प्रभू आम्हाला अधिक तुझ्या प्रार्थनेत राहण्यास आणि खंबीर राहण्यास मदत कर. आम्हाला प्रत्येक परीस्थितीत सहन करण्यास सहाय्य कर. तुझी इच्छा पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. येशुच्या नावात आमेन.