“तो खरोखर ऐकतो.”

“तो खरोखर ऐकतो.”

“तो खरोखर ऐकतो.”

वचन:

स्तोत्र 116:1
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.

निरीक्षण:

मला या वचनामध्ये स्तोत्रकर्त्याचे शब्द आवडतात. हे खूप सहज आणि सत्य आहे. लेखक सहज म्हणतो, “मी परमेश्वरावर प्रेम करतो. कारण तो माझी विनवणी ऐककतो; मला हे स्पष्ट नाही की दाविद कोणत्या प्रकारच्या आव्हानाचा सामना करत आहे, परंतु तो फक्त म्हणतो, “परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे.” मागील अध्यायात, दाविदाने अशा लोकांबद्दल सांगितले जे वैयक्तिकरित्या सोन्या-चांदीपासून देव बनवतात जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, हलू शकत नाहीत, स्पर्श करू शकत नाहीत, वास घेऊ शकत नाहीत किंवा चालू शकत नाहीत. आता या अध्यायात, दाविद आपल्या देवाबद्दल म्हणतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, “तो खरोखर ऐकतो.”

लागूकरण:

कितीवेळा तुम्ही तुमच्या पलंगावर, किंवा जमिनीव, किंवा सोफ्यावर गुडघे टेकले, किंवा स्वयंपाकघरातील टेबलावर तुमचा चेहरा हातात घेऊन रडत रडत म्हणाला, “हे देवा मला आत्ता तुझी गरज आहे?” किती वेळा? मी वैयक्तिकरित्या किती वेळ हे मोजू शकत नाही. अनेक वेळा जीवनात असे झाले आहेत की मी दुसरे पाऊल उचलू शकेन असे मला वाटले नाही आणि त्या समयी माझ्या देवाने माझे ऐकले! त्याने माझी विनवणी ऐकली. मी तुम्हाला सांगू शकतो, एक मुलगा मोठा होत असताना, काही वेळा मी माझ्या वडिलांना त्यांच्या बेडरूममध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये प्रार्थना करताना ऐकले होते, “हे प्रभू कृपया माझ्यावर दया करा!” मी फक्त माझ्या वडिलांच्या प्रार्थनेची वर्षानुवर्षे नक्कल केली. पण आता आपल्याला माहीत आहे की वडील दाविद राजाच्या प्रार्थनेची नक्कल करत होते. आणि जसे देवाने दावीदाचे प्रार्थना ऐकले आणि राजाला उत्तर दिले, तसाच तो आज तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल. कारण “तो खरोखर ऐकतो!”

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी असू शकत नाही, परंतु जवळजवळ दररोज मला असे वाटते की मी पुन्हा संकटात पडतो. मग मी असो किंवा नसो, मी पुढे जाऊन पुन्हा प्रार्थना करणार आहे! हे देवा, माझ्यावर दया कर. मला जास्त माहिती नाही, पण मला हे माहित आहे. तू खरंच प्रार्थना ऐकतो आणि त्याचे उत्तर देतो. येशुच्या नावात आमेन.