वचन:
आमोस 9:11
दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;
निरीक्षण:
येथे आमोस संदेष्ट्याने आपल्या काळात संदेश दिला, एक दिवस येत आहे जेव्हा देव आपल्या इस्राएल लोकांना त्यांच्या स्वतःच्या भूमीत पूर्णपणे पुनर्संचयित करेल जसे ते पूर्वी होते. ही एक आश्चर्यकारक भविष्यवाणी होती कारण इस्राएल म्हणून ओळखली जाणारी जागा खुप वर्षापूर्वी पडलेल्या अवस्थेत होती आणि पूर्ण गोंधळात होती. म्हणूनच आमोस त्या काळात संदेष्टा होता. तो देवाच्या स्वर्गीय भिंगातून भविष्याकडे पाहत होता आणि त्याने जे पाहिले ते त्याला पूर्णपणे समजू शकले नव्हते. त्याने पुढच्या काही वचनांमध्ये नक्कीच प्रयत्न केला, परंतु आमोस जेव्हा “त्या दिवशी!” असे म्हणत होता तेव्हा तो काय बोलत होता हे फक्त तुम्ही आणि मीच समजू शकतो.
लागूकरण:
हा मजकूर प्रेषितांच्या पुस्तकात आणि आपल्या धन्य प्रभुचा भाऊ याकोब याने आपल्या पुस्तकात संदर्भित केला आहे. ज्यांनी त्याचा संदर्भ घेतला, त्यांना हे माहित होते की दाविद आणि शलमोन या राजांनी ज्या दिवसात राष्ट्राचे नेतृत्व केले त्या दिवसांत इस्राएलाची पुनर्स्थापना अद्याप झाली नव्हती. मी जे म्हणत आहे ते असे आहे की त्यांना माहित होते की ते भविष्यात होणार आहे. अर्थात, 2000 वर्षांनंतर 1948 मध्ये इस्राएल अखेर स्वतः एक राष्ट्र बनले! आपल्यापैकी ज्यांना पवित्र भूमीवर जाण्याचा बहुमान मिळाला आहे त्यांना माहित आहे की हे एक सुंदर ठिकाण आहे. देव आपली अभिवचने पाळतो याचीही आपल्याला आठवण करून दिली जाते. परमेश्वराने तुम्हाला कोणते अभिवचन दिले आहे? कदाचित तुमच्या बाबतीत अद्याप असे घडले नसेल. पण मी तुम्हाला आठवण करून देतो की “त्या दिवशी,” जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर असे म्हणू शकाल,” देव आपली अभिवचने पाळतो.”
प्रार्थना:
प्रिय येशू,
मला माहीत आहे की तू मला एक अभिवचन दिले आहेस, जे मला अजून प्राप्त झालेले नाही. पण तू तुझे अभिवचन पाळशील यावर माझा विश्वास बसला आहे. माझ्या योग्य समयात ते घडेल असाही माझा विश्वास आहे. मी “त्या दिवसात” माझ्यासोबत ती अभिवचने घडण्याची वाट पाहत आहे. मला माहित आहे की तू आपली अभिवचने पाळतोस. येशुच्या नावात आमेन.