“दिशाहीन”

"दिशाहीन"

“दिशाहीन”

वचन:

प्रेषित 2:40
आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”

निरीक्षण:

पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राचे परिवर्तनात्मक संदेशाचे हे शेवटचे शब्द आहेत. जेव्हा त्याने शेवटचा शब्द पूर्ण केला, तेव्हा सुमारे तीन हजार लोक ख्रिस्ताला त्यांचा वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारण्यासाठी पुढे आले आणि त्यासमयी मंडळीची सुरूवात झाली. “या भ्रष्ट पिढीपासून” स्वतःला वाचवणे हे लोकांवर अवलंबून आहे असे सांगून पेत्राने समाप्त केले. बायबलच्या किंग जेम्स व्हर्शनमध्ये “दुर्दैवी” हा शब्द वापरण्यात आला आहे. खरे सांगायचे तर, प्रत्येक पिढीशी भ्रष्टाचाराचा एक घटक जोडलेला असतो, परंतु किंग जेम्समध्ये वापरला जाणारा हा शब्द “दुर्दैवी” आज आपल्याशी विशेषतः बोलतो.

लागूकरण:

दुर्दैवी या शब्दासाठी असलेला दुसरा शब्द “दिशाहीन” हा असू शकतो. ही सध्याची पिढी दिशा आणि उद्दैश्यांसाठी इतकी हताशपणे का झगडत आहे? माझा विश्वास आहे की याचा संबंध परमेश्वरावरील वैयक्तिक भक्तीच्या अभावाशी आहे.  त्याद्वारे, मला असे म्हणायचे आहे की जेव्हा एखादा पुरुष किंवा स्त्री पूर्णपणे सर्व गोष्टी येशूवर सोडून देतात, तेव्हा ते त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूची अधिक चांगली काळजी घेतात. ते परिश्रमपूर्वक अभ्यास आणि संशोधन करतात. ते त्यांचे शरीर स्थितीत ठेवतात. ते खात्री करतात की त्यांची आध्यात्मिक बाजू देवाच्या गोष्टींने चांगले पोषित आहे. मी अलीकडेच एका देवाच्या दासाला असे म्हणताना ऐकले आहे की आजच्या पिढीबद्दल त्याचा निष्कर्ष असा आहे की ते त्यांच्या स्वत: च्या विचारांच्या जीवनातून खूप दिशा घेतात आणि ते वैयक्तिकरित्या काय विचार करतात याबाबत सोशल मीडियावर प्रचार करतात. परमेश्वर स्वतः म्हणतो, माझे विचार तुमचे विचार नाहीत. जेव्हा आपले स्वत:चे विचार या जीवनात आपल्याला मार्गदर्शनासाठी आपले स्वतःचे शिक्षण आणि वैयक्तिक स्वयं-मदतीस टिप्स बनतात, तेव्हा ते आपल्याला “दिशाहीन” बनवतात. केवळ येशूच हा खडक आहे जो आपल्याला वाचवू शकतो आणि आपल्याला जगण्याचा उद्देश देऊ शकतो.

प्रार्थना:

प्रिय येशू,

अनेक वर्षांपूर्वी माझे तारण केल्याबद्दल तुला धन्यवाद. जीवनात पुढे जाण्यासाठी उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे, मी कुठे जात आहे याबद्दल मला कधीच संशय वाटत नाही. कारण तुच माझी दिशा आहे. येशुच्या नावात आमेन.