“देवाचा माणूस तुमचा शत्रू कधीपासून आहे?”

"देवाचा माणूस तुमचा शत्रू कधीपासून आहे?"

“देवाचा माणूस तुमचा शत्रू कधीपासून आहे?”

वचन:

1 राजे 21:20

अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय”? तो म्हणाला, होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वत:ला विकून टाकले आहेस.

निरीक्षण:

अहाब हा इस्राएलचा दुष्ट राजा होता. तरीही तो एलीयाला चांगल्या प्रकारे ओळखत होता, आणि त्याला माहीत होते की जर त्याने प्रभूविरुद्ध बंड केल्यास एलीया त्याच्या पाठीमागे लागेल. तरीही त्याने बंड केले. लक्षात ठेवा, हा तोच एलीया आहे ज्याचा आधी अहाबाशी सामना झाला होता. एलीयाने इस्राएलामध्ये तीन वर्षांच्या दुष्काळासाठी प्रार्थना केली होती कारण इस्त्राएल लोकांच्या मार्गभ्रष्टतेमुळे तसे घडले. त्याने कर्मेल पर्वतावर स्वर्गातून अग्नी मागविला आणि बाअलाच्या संदेष्ट्यांची कत्तल केली होती. यामुळे अहाबाची जादूगार पत्नी, ईजबेल चिडीस आली. पण आता, अहाबाला नाबोथ नावाच्या व्यक्तीचा द्राक्षमळा हवा होता. तथापि, नाबोथाने ते त्याला विकले नाही. अहाब लेकराप्रमाणे रडत घरी गेला. अहाबाला नाबोथाचा द्राक्षमळा मिळावा म्हणून त्याची पत्नी ईजबेल हिने नाबोथाला ठार केले. देवाने एलीयाला सांगितले की जाऊन अहाबास भेट आणि त्याला सांगा की त्याचे दिवस मोजले गेले आहेत. जेव्हा एलीया राजाच्या दारात आला तेव्हा राजा म्हणाला, “माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय”?

लागूकरण:

“देवाचा माणूस तुमचा शत्रू कधीपासून आहे?” या राजाच्या विधानाला दिलेला हा सर्वात तार्किक प्रतिसाद आहे. ज्याने तुम्हाला आणि विश्वातील सर्व काही निर्माण केले त्या विश्वाच्या देवाला स्व समर्पण करणारे पुढारी तुम्ही बनू इच्छित नाही का? तरीही, जेव्हा तुमचे हृदय अहाबाप्रमाणे अभिमानाने आणि आत्ममग्नतेने फुललेले असते, तेव्हा तुम्हाला खरोखर असे वाटेल की तुम्ही त्या देवाशी काही प्रमाणात स्पर्धा करू शकता! ते अहाबाचे पतन होते. कालांतराने एलीयाच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आणि अहाब आणि त्याच्या जादूगार पत्नीचा अंत झाला. मी तुम्हाला हे सांगू शकतो, देवाचा पुरुष किंवा स्त्री कधीही माझा शत्रू होणार नाही.

प्रार्थना:

प्रिय येशू,

मला फक्त तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. जेव्हा मी पवित्र शास्त्राचा हा उतारा वाचला तेव्हा मला पहिला विचार आला की अहाब आणि त्याची दुष्ट पत्नी काय मूर्ख आहेत. प्रिय प्रभु, मला तुझ्याशी कधीही स्पर्धा करायची नाही. तुझ्याजवळ माझ्यासाठी जे काही आहेस त्यास स्वत:स समर्पण करण्यास मी पूर्णपणे तुझा आहे. येशुच्या नावात आमेन.