“देवाचे भय”

"देवाचे भय"

“देवाचे भय”

वचन:

उपदेशक 12:13

आता सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.

निरीक्षण:

शलमोन हा इस्राएलाचा राजा होता. तुम्हाला आधीच माहीत असेल की, जुन्या करारातील यहुदी लोक हे देवाचे निवडलेले लोक होते. येथे देवाच्या निवडलेल्या लोकांवरील राज्य करणाऱ्या राजाने सांगितले की त्यांनी देवाचे भय बाळगावे आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात. कारण हे केवळ देवाच्या निवडलेल्या लोकांचेच नव्हे तर सर्व मानवजातीचे कर्तव्य आहे. तर हा उतारा आत्ता आपल्याशी “देवाचे भय बाळगणे” या विषयावर बोलत आहे.

लागूकरण:

माझ्या वडिलांनी मला देवाचे भय बाळगायला शिकवले, तेव्हा ते खऱ्या भीतीबद्दल बोलत होते. ते मला म्हणायचे, “बेटा, जर तुला आपल्या सर्वशक्तिमान देवाची केवळ महानता आणि विशालता जरी समजली, तर त्याच्या नावाचा उल्लेखही ऐकून तू थरथर कापशील.” जर त्यांनी मला काही चुकीचे करताना पाहिले तर ते मला पकडत असे आणि म्हणत असे, “बेटा, तुझा स्वर्गीय पिता तुला पाहत आहे.” वाह! माझ्या वडिलांकडे त्यांच्या निर्माणकर्त्याबद्दल असलेली भीती माझ्यापर्यंत पोचवण्याचा मार्ग फार छान होता. माझा विश्वास आहे की एक राष्ट्र आणि एक जग म्हणून आपण ते गमविले आहे. मी विश्वासाच्या इतर परंपरांबद्दल बोलू शकत नाही, परंतु ख्रिस्ती विश्वासासाठी, आम्ही संकटात असल्याचे दिसते. आम्ही अशी पिढी वाढवली आहे जी परमेश्वराला घाबरत नाही. खरं तर, देवाप्रमाणे तरुण प्रौढांच्या सध्याच्या पिढीवर माझा विश्वास नाही. ते त्याच्या मानकांचा तिरस्कार करतात. “देवाची भीती बाळगणे” हा त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग नाही राहीला.  मी आशा करतो आणि प्रार्थना करतो की देव त्याचा पुत्र, येशू, याच्या सामर्थ्याला, सैतानी गड मोडून टाकण्यास आणि त्याच्या नावाची भीती बाळगण्यास आणि आपल्याला मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा प्रकट करेल.

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज, मी प्रार्थना करतो की तू या राष्ट्रातील आणि जगभरातील सैतानाचे गड मोडून टाक. आम्हाला लोक म्हणून मुक्त कर ज्यांना बरोबर काय आणि चुकीचे काय हे माहित आहे. माझ्यामध्ये कार्याची सुरूवात करण्यास आणि ते कार्य माझ्या सभोवतालच्या इतरांपर्यंत पसरण्यास मला सहाय्य कर. मी प्रार्थना करतो, कृपया आम्हाला या आत्मोन्नतीच्या गोंधळात आणि स्वर्गातील नियमांकडे दुर्लक्ष करण्यास सोडून देऊ नकोस. माझा विश्वास आहे तू मला परमेश्वराचे भय दिले आहे व त्यात चालवत आहेस व त्याच्या आज्ञा पाळावयास शिकवत आहेस त्याबद्दल तुझे आभार. येशुच्या नावात आमेन.