वचन:
लूक 1:80
तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्त्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहीला.
निरीक्षण:
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल ही एक छोटी कथा आहे. जेव्हा त्याची आई गरोदर राहिली तेव्हा त्याचे आईवडील खूप वृद्ध होते. तो त्याच्या पालकांच्या प्रार्थनांचे उत्तर होता. जन्मानंतर, बायबल म्हणते की तो अरण्यात वाढला आणि तेथे राहताना तो आत्म्याने बलवान झाला. तो इस्राएलामध्ये प्रकट झाला तोपर्यंत तो प्रभूच्या गोष्टींमध्ये पारंगत झाला होता. ही कथा “देवाच्या माणसाची घडण” याबद्दल आहे.
लागूकरण:
बहुधा, बाप्तिस्मा करणारा योहान लहानपणी एकांतात वाढला असावा. त्याचे आई-वडील खूप वृद्ध होते आणि कदाचित ते एखाद्या शहराबाहेर अतिशय नम्र निवासस्थानी राहत असावे. याचा अर्थ असा होतो की योहानाच्या मानसिकतेत कोणत्याही प्रकारचा फारसा बाहेरचा प्रभाव नव्हता. होय, तो वेगळा होता. शास्त्रवचने आपल्याला सांगतात की बाप्तिस्मा करणारा योहान उंटाच्या केसांचे कपडे घालत असे आणि टोळ आणि जंगली मध खात असे; तो प्रकट झाला तेव्हा स्वर्गाचे राज्य जवळ आले म्हणून पश्चात्ताप करा अशी घोषणा त्याने केली. “देवाच्या माणसाची घडण” कधीकधी शांत, एकाकी ठिकाणी उत्तम प्रकारे पूर्ण होत असते. अशा प्रकारच्या संगोपनाचा अर्थ असा होतो की योहान सतत प्रार्थनेत प्रभूला शोध घेत असावा. माझा विश्वास आहे की देवाने तरुण बाप्तिस्मा करणारा योहान यास प्रशिक्षण देणे, शिकविणे आणि परीक्षा या गोष्टींची व्यवस्था केली होती, जेणेकरून तो मोहापासून जवळजवळ अभेद्य राहीला. येशूसाठी बलिदान होऊन मरण येईपर्यंत त्याने प्रभूच्या सूचनांचे पालन केले. एकटेपणा ही नेहमीच वाईट गोष्ट नसते जर ती आपल्याला येशूसोबत आपला वेळ घालवण्यास भाग पाडत असेल तर.
प्रार्थना:
प्रिय येशू,
मला तुझ्या प्रतिमेत एकरूप होण्यासाठी तू मला देऊ इच्छित असलेल्या कोणत्याही प्रकारच्या एकटेपणासाठी मी तयार आहे. इतरांकडून काहीतरी वेगळे मिळविण्याचा प्रयत्न करणे ही माझी इच्छा नाही. आयुष्यभर तू मला नेहमी प्रार्थनेच्या मुद्रेत ठेवले आहेस. येशू, कृपया मला तुझ्या जवळ ठेव आणि मला तुझ्यासारखे बनव हीच माझी प्रार्थना आहे. येशुच्या नावात आमेन.