वचन:
योएल 2:17
देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’
निरीक्षण:
योएल संदेष्ट्याद्वारे, देव त्याच्या लोकांना भविष्यासाठी तयार करत होता. त्याने आपल्या लोकांना सांगितले की देवाच्या याजकांना संजीवनासाठी शलमोनाच्या मंदिरातील देवडी आणि वेदी यांच्यामध्ये रडून मध्यस्थी करण्याची वेळ आली आहे. तो म्हणाला की याजकांची प्रार्थना देवाने त्याच्या लोकांचा बचाव करवा आणि त्याच्या लोकांचा नाश करू नये यासाठी आहे. या लढाईच्या वेळी ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी म्हणावे अशी त्याची इच्छा नव्हती.
लागूकरण:
जेव्हा मी या सकाळी ही वचने वाचली, तेव्हा माझ्या मनात मला खात्रीने वाटले की, “देवाच्या सेवकांनी प्रार्थना करावी याची वेळ आली आहे!” मी असे म्हणतो कारण मी लिहित असताना असे दिसते की जग गोंधळात आहे. तसेच, देवाचे पुरुष आणि स्त्रिया जे आज मंडळीचे नेतृत्व करत आहेत ते वैयक्तिक त्याग आणि देवाप्रती पूर्ण मनाने अभिषिक्त वचनबद्धतेतून करत आहेत. यामुळे, माझ्या देशात काही लोक त्यांच्या विरोधात सूडबुद्धीने उतरले आहेत. प्रभूंच्या लोकांचा छळ होताना आपण पाहत आहोत. मंडळी आणि तीचे नेतृत्व करणार्या स्त्री-पुरुषांसाठी आज एकच उत्तर आहे की त्यांनी आपले नेत्र येशूकडे लावून प्रार्थना करावी. जुन्या करारात केल्याप्रमाणे तो आत्ताही आपले नेतृत्व करतो. दैनंदिन प्रार्थना आणि देवाच्या भक्तीपासून स्वतःला वेगळे करणे आता अशक्य आहे कारण आपण देवाच्या सूडाची वेळ येत आहे असे पाहतो. या छळवणूकीच्या काळामध्ये देवाचे वचन मोठ्या प्रमाणात पसरले जात असता “देवाच्या सेवकानी प्रार्थना करावी ही वेळ आली आहे” कारण त्यांना या दिवसात देवाच्या सामर्थ्याची सर्वात जास्त गरज आहे म्हणून आपण सर्वजन त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.
प्रार्थना:
प्रिय येशू,
आज या समयी प्रभू तुझ्या दासांसाठी मी प्रार्थना करतो, प्रभू हा समय तुझ्या सामर्थ्याने अधिक भरण्याचा आहे, कारण शेवटचा काळ आहे आणि तू येण्याचे दिवस जवळ आलेले असता तुझ्या सेवकांनी अधीक प्रार्थना करण्याची ही वेळ आहे. म्हणून आम्हा सर्वांना तुझ्यामध्ये आपला समय व्यतित करण्यास सहाय्य कर. तुझ्या अभिषेकाने अधिक भर जेणेकरून प्रभू तुझे गौरव होऊन राष्ट्रांनी तुझ्या नावात आपले गुडघे टेकावे व प्रत्येक जिव्हेने कबूल करावे की येशू प्रभू आहे. येशुच्या नावात आमेन.