“परीक्षा उन्नती घेऊन येते”

"परीक्षा उन्नती घेऊन येते"

“परीक्षा उन्नती घेऊन येते”

वचन:

2 तीमथ्य 3:12
ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;

निरीक्षण:

प्रेषित पौलाने आपला तरुण सहकारी तीमथ्य याच्याशी बोलताना सांगितले की, जर तू खरोखरच येशूचा शिष्य होऊ इच्छित असशील तर कालांतराने तुला कोणत्या ना कोणत्या छळाला सामोरे जावे लागेल. जसजसे एखादी व्यक्ती शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वाढते, तसतसे ती काही प्रकारच्या छळासाठी किंवा संघर्षासाठी तयार असली पाहिजे. मी हे म्हणण्याचे कारण त्याच कारणासारखे आहे जसे की एखादा कुस्ती खेळणारा खेळाडू जिंकण्यासाठी लढतो. त्याला उंच करण्याआधी त्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. म्हणजे “परीक्षा उन्नती घेऊन येते”, ही एक कल्पना आहे ज्यामुळे सर्वत्र पुरुष आणि स्त्रिया पृथ्वीवरील अंतिम बक्षीस मिळविण्यासाठी सर्व धोका पत्करतात, परंतु या प्रकरणात, स्वर्गातील सार्वकालिक जीवनाचे अंतिम बक्षीस आणि शासन आणि एके दिवशी ख्रिस्ताबरोबर राज्य करणे हे आहे.

लागूकरण:

कोणत्याही गंभीर विचारवंताचा असा विश्वास असू शकत नाही की एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय पदोन्नती दिली जाऊ शकते. तुम्ही कोणाच्या अब्जावधी संपत्तीचे वारस असल्याशिवाय असे होत नाही. नाही! ते केवळ असेच घडत नाही. नेहमीच “परीक्षाच आहे जी उन्नती घेऊन येते”. म्हणून येथे,पौल तीमथ्याला आणि आपल्या सर्वांना याची जाणीव करून देतो की जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये ईश्वरी जीवन जगू इच्छितो त्याचा छळ होईल. आमची परीक्षा घेतली जाईल. छळ म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी. पण मी तुम्हाला हे सांगू शकतो की, माझ्या संपूर्ण जीवनात, मी लोकांची अशा ठिकाणी परीक्षा होताना पाहीले की जेथे त्यांची इच्छा नव्हती की तेथे त्यांची परीक्षा व्हावी. आणि जेव्हा ते त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात तेव्हा ते उन्नत होतात. अशाच प्रकारे देवाने योजना केली आहे. ही “परीक्षाच आहे जी  उन्नती घेऊन येते.”

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज तू मला अशा मार्गांनी मार्गदर्शन करावे जे मला उंचावण्यास मदत करील. अर्थातच, मला सोपे जीवन हवे आहे, परंतु कोणत्याही गोष्टीपेक्षा मला माझ्या आयुष्यात तुझी इच्छा पुर्ण झालेली हवी आहे. परमेश्वरा, मला तुझ्या विपुल आयुष्याकडे घेऊन जा, मी प्रार्थना करतो. येशुच्या नावात आमेन.