“पवित्र कित्ता”

"पवित्र कित्ता"

“पवित्र कित्ता”

वचन:

2 थेस्सलनी 3:9
तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले.

निरीक्षण:

यापूर्वी, प्रेषित पौलाने लिहिले होते की जेव्हा ते आणि त्याचे सहकारी थेस्सलनिकामध्ये सेवा करत होते, तेव्हा त्यांनी मंडळीसाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम केले. जेव्हा ते कोणाचे अन्न खात असे तेव्हा ते त्याचे पैसे देत असे. “विश्वासू” व्यक्तीने कसे जगले पाहिजे याचा कित्ता होण्यासाठी त्यांनी असे केले.

लागूकरण:

माझ्या संपूर्ण आयुष्यात, असे चुकिचे कित्ते पाहीले आहेत ज्याचे अनुकरण तरुण मंडळी करते. पौल ज्या मंडळीसाठी लिहीत होता, ती काही बाबतीत आळशी बनली होती. काही जण येशू परत येण्याची वाट पाहत बसले होते. पौल म्हणाला, जर तुम्ही काम करत नसाल तर तुम्ही खाऊ नये. पौल या ठिकाणी काम करण्याबद्दल सांगत आहे, व स्वत: जबाबदार होण्याची शिकवण देत आहे. काम करणे किती महत्वाचे आहे याबद्दल जर सांगायचे तर स्वत: पौल राहूट्या बनवून स्वत:चा उदरनिर्वाह करत असे व सेवा करत असे म्हणून तो आज सर्व तरूण मंडळीला सांगता आहे की आपण काम करावे कारण जो काम करत नाही त्याने खाऊ नये.

प्रार्थना:

प्रिय येशू,

माझ्यामध्ये असलेला माझा सर्वा आळस काढून टाक, मला जबाबदार व्यक्ती बनण्यास मदत कर. मला मंडळीसाठी “पवित्र कित्ता” बनण्यास मदत कर. येशूमध्ये लोकांना वास्तविक जीवनात नेण्यास मला मदत करा. येशुच्या नावात आमेन.