वचन:
1 करिंथ 15:14
आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ;
निरीक्षण:
पौलाच्या दिवसांत, मेलेल्यांतून पुनरुत्थान होत नाही असा विश्वास ठेवणारे लोक होते. पण पौलाने असा युक्तिवाद केला, “जर मेलेल्यांतून पुनरुत्थान झाले नाही तर ख्रिस्तही उठला नाही. जर ख्रिस्त मेलेल्यांतून उठला नसेल, तर आमच्या घोषणेला काही किंमत नाही आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे”
लागूकरण:
प्रेषित पौलाने या अध्यायात मेलेल्यांतून पुनरुत्थानासाठी इतका विलक्षण युक्तिवाद केला की तो शेवटी असे म्हणू शकला असता, “प्रभूच्या आगमणा समयी तुम्ही मेलेल्यांतून उठवले जाल की नाही याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर याचा विचारही करू नका” सर्व काही येशूच्या मरणातून पुनरुत्थानावर अवलंबून आहे. बहुतेक शिष्यांच्या रक्तसाक्षीच्या मृत्यूचे कारण हे होते की ते स्वतः येशूच्या पुनरुत्थानाते साक्षी होते. जेव्हा ते घडले, त्यानंतर स्वर्गात त्याचे स्वर्गारोहण झाले, तेव्हा त्याने त्यांना जे काही सांगितले आणि शिकवले ते खरे होते हे त्यांना कळून चुकले. ते आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी मरण्यास तयार होते. सत्य हे आहे की येशू लवकरच येणार आहे. जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते मेलेल्यांतून उठवले जातील आणि आपल्यातील राहीलेले प्रभूला भेटण्यासाठी एकत्र घेतले जातील.
प्रार्थना:
प्रिय येशू,
रोज सकाळी, मला नेहमीपेक्षा जास्त आठवण करून दिली जाते की तुझे येणे बर्याच लोकांच्या विश्वासापेक्षा खुप लवकर होत आहे. प्रभो मला तुझ्या वचनात राहण्यास आणि लोकांना तुझ्या मरणाची आणि मरणातून पुन्हा उठविले जाण्याची घोषणा करण्यास मदत कर, येशुच्या नावात. आमेन