वचन:
फिलिप्पै 4:8
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुध्द, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.
निरीक्षण:
प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील तरुण मंडळीच पत्र समाप्त करण्यास सुरुवात केल्यावर, तो त्यांना “पुर्नरचित करण्याचे आव्हान” देतो. ख्रिस्ताच्या नवीन अनुयायांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे येशूमधील त्यांच्या नवीन जीवनासाठी त्यांच्या जुन्या जगण्याच्या मानसिक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहण्याचा मार्ग पुन्हा तयार करणे होय. जेव्हा तुम्ही येथे सर्व नवीन नविन पुर्नरचित होण्याचे आव्हाने पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की ख्रिस्ती जीवन हे स्वतःसाठी जगत असलेल्या जीवनापेक्षा खूप चांगले आहे.
लागूकरण:
या उतार्याबद्दल मला जे आवडते ते असे आहे की आपण आपले विचार जीवनात खरोखर बदलू किंवा पुनर्रचित करू शकतो. खरं तर, जेव्हा पौल हे नवीन आव्हान पूर्ण करतो, तेव्हा तो म्हणत नाही की या क्षेत्रात बदल करण्याचा विचार करा, त्याऐवजी तो म्हणतो, “अशा गोष्टींचे मनन करा!” हे ऐच्छिक नाही; ते एक निर्देशक आहे. आपण कसे बदलू शकतो? प्रथम, ख्रिस्त आता आपल्यामध्ये राहतो, आणि म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. दुसरे, जेव्हा तुम्ही नवीन ख्रिस्ती असाल तेव्हा आपला पहिला विचार नेहमीच सर्वोत्तम विचार असतो असे नाही. त्यामुळे आपली जीभ सांभाळायला शिका आणि पुढचा विचार विचारात घ्या, जो पौलाच्या आव्हानांकडे पाहण्याचा नवीन मार्ग आहे. शेवटी, “पुर्नरचित होण्याचे आव्हान” सोडू नका, कारण जुन्या सवयी मोडण्यास आणि योग्यरित्या विचार करण्याच्या नवीन पद्धती स्थापित करण्यास वेळ लागेल. देवाच्या मदतीने, आपण सर्वजण “पुर्नरचित होण्याचे आव्हान” स्वीकारू शकतो.
प्रार्थना:
प्रिय येशू,
मी अनेक वर्षांपासून तुझा अनुयायी आहे, परंतु प्रत्येक दिवशी मला “पुर्नरचित होण्यास आव्हान” स्वीकारावे लागेल. मोह नेहमीच जवळ असतो आणि जेव्हा मी अस्वस्थ असतो तेव्हा मला मित्र मंडळीकडे जाण्याची इच्छा असते. पण ख्रिस्ती म्हणून काम करण्याची ही पध्दत नाही. येशू, मला मदत कर की मी माझे जीवन तुझ्या इच्छेनुसार जगावे. येशुच्या नावात आमेन.