प्रशस्त स्थळ

प्रशस्त स्थळ

वचन:

स्तोत्रसंहिता 31:8
तू मला वैऱ्याच्या कोंडीत सापडू दिले नाही; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस.

निरीक्षण:

राजा दावीद आपल्या प्रिय इस्राएल राष्ट्राकरता किती भार वाहत होता याची त्याला नेहमी जाणीव होती. या वचनात, तो पुन्हा एकदा शत्रूंच्या वर्चस्वामुळे त्रस्त झाला आणि तो परमेश्वराला म्हणाला, “तू माझ्या शत्रूंना माझ्यावर चढून जाऊ दिले नाहीस आणि मला त्यांच्या स्वाधीन होऊ दिले नाहीस, उलट तू माझे पाय अशा प्रशस्त स्थळी स्थिर केले आहेस जेथे , “मोकळी जागा!” आहे.

लागूकरण:

तुमच्यासमोर येणार्‍या आव्हानामुळे तुम्ही कधी इतके भारावून गेला आहात की तुम्हाला संकटात पडल्यासारखे वाटले? कदाचित तुम्ही आपले बिल देऊ शकत नसाल, किंवा एखाद्या रोगाचे निदान झाल्यावर तुम्ही घाबरून गेले असाल, किंवा  आपल्या मुलाच्या वाईट संगतीबद्दल तुम्ही काळजीत असाल, आपल्या मित्रमंडळींच्या जीवनातील त्रासामुळे तुम्ही दु:खी असाल. परंतु, जर खरे सांगायचे असेल तर, आपल्याला असे वाटेल की आपण अडकले आहोत व त्याबद्दल आपण काय करावे हे आपल्याला कळत नाही. पण तुम्हास सांगू द्या की, येशूला तुमची काळजी आहे, ह्याच्या किंवा त्याच्याबद्दल नव्हे तर त्याला आज तुमच्याबद्दल काळजी आहे. तो तुम्हाला शत्रूच्या हल्ल्यापासून मुक्त करावयास तयार आहे, आणि अशा प्रशस्त स्थळी तुम्हाला स्थिर करावयास तयार आहे जेथे तुमच्यासाठी “मोकळी जागा” असेल. म्हणून आज या जगावर भरवसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण या, तो तुमच्या गरजा व तुमचे दु:ख जाणतो व त्यामधून तुमची सुटका करू इच्छितो, आपण एकत्र प्रार्थना करू तेव्हा प्रभूवर या गोष्टीसाठी विश्वास ठेवा.

प्रार्थना:

प्रिय येशु,

 आज शत्रूने माझ्या मित्र आणि मैत्रिणींवर किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीवर जे संकट आणले आहे ते तुला माहीत आहे. तू त्यांना या संकटातून बाहेर काढ आणि त्यांचे पाय इतक्या प्रशस्थ  आणि शांत स्थळी स्थिर कर, जेणेकरून त्यांना वाटेल की ते, “मोकळ्या जागेत!” आहेत. येशूच्या नावात आजच असे कर,  आमेन.