वचन
मार्क 14:36
आणि तो म्हणत होता, अब्बा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; परंतू माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
निरीक्षण:
या वचनात आपण बलिदानाच्या समयाला पाहतो, जेथे येशू आपल्या पित्याला म्हणत आहे, “तुला सर्व काही शक्य आहे”. त्याला माहीत होत की त्याच्या पित्याने काय केले. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू आहे. जो अब्राहामाला शंभरव्या वर्षी पुत्र देतो. जो मेलेल्यांना जिवंत करू शकतो. तो सर्व काही करू शकतो म्हणून तो म्हणतो तुला सर्व काही शक्य आहे. पुढे तो म्हणतो “हा प्याला माझ्यापासून दूर कर” येथे आपल्याला त्या पुत्राची विनंती कळते जेव्हा एखाद्या त्रासात असता तो आपल्या पित्याकडे करतो. येथे त्याला माहीत आहे की आपला पिता हे करू शकतो. आणखी तो पुढे म्हणतो “परंतू माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” येथे आपल्याला पित्याची आज्ञा पालन करणारा पुत्र दिसतो जो ओळखतो की त्याचा पिता काय करणार आहे. येथे अशी परिस्थिती दिसते, एक विनंती करणारा पुत्र, आणि आज्ञा पाळणारा पुत्र जो स्वत:चे बलिदान करत आहे. आणि असा पिता जो आपल्या पुत्राची व्याकुळता पाहून गप्प बसलेला आहे, कारण या त्यांना माहीत आहे की ते काय करत आहे.
लागूकरण:
देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. या बलिदानाच्या समयाबद्दल विचार करून पाहा, काय तो समय होता दोघेही शांत होते कारण त्यांना माहीत होते की त्यांचे प्रेम कोणावर आहे. तुमच्या व माझ्यावर, आज या बलिदानाच्या समयाची आठवन करत असताना जसा पुत्र आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागला तसे आपण आज आपल्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत का? का एवढ्या मोठ्या बलिदानाकडे दुर्लक्ष करत आहोत? आज आपल्या जिवनात त्या देवाला म्हणा की हे प्रभू माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कारण तुझी इच्छा माझ्यासाठी उत्तम आहे. त्या येशू सारखं एक आज्ञाधारी पुत्र होण्यासाठी झटा. कारण देवाचे प्रेम अगापे आहे सार्वकालिक आहे. आपला पुत्रास राखून न ठेवता त्याने तो तुम्हा आम्हा करिता बलिदान केला, जेणेकरून जी व्याकूळता, जो त्रास, जी पीडा येशूने वधस्तंभावर सहन केली त्याचा एक लवलेशही आपल्याला अनुभव करता न यावा. म्हणून आजच संधी आहे प्रभूचे वचन तुम्हाकडे आले आहे त्याच्यावर प्रेम करा त्याचा आपला प्रभू व तारणारा म्हणून स्विकार करा. तो आपल्या खुप प्रेम करतो. आणि देव जो आपल्याला आपल्याला अब्बा, पिता म्हणण्याचा अधिकार देतो.
प्रार्थना:
प्रिय येशू,
आज तुझ्या त्या बलिदानाच्या समयाची आठवण करत असताना, प्रभू याचा अनुभव येतो की तो समय तुझ्यासाठी किती त्रासदायक होता तरीही तु म्हणतोस माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. प्रभू मला तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास सहाय्य कर. मी हे जीवन तुला समर्पित करत आहे. तू माझ्या अब्बा, पिता आहेस जो माझ्यावर खुप प्रेम करतो. येशुच्या नावात आमेन.