वचन:
यशया 21:3
हे पाहून माझ्या कमरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिले देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलों आहे की मला दिसत नाही.
निरीक्षण:
ही भविष्यवाणी बाबेल पतनाच्या 200 वर्षांपूर्वी महान संदेष्टा यशया याने केली होती. तुम्ही वाचत असता, राजा बेलशस्सरास बाबेलच्या सर्व पक्षांना संपविण्यासाठी मोठ्या खोलीत मेजावर बसवताना पाहून त्याला अक्षरशः धक्काच बसला होता. यशयाने पवित्रशास्त्रातील “भविष्यवाण्यांच्या” भविष्यातील दृष्टीकोनातून पाहिलेली वास्तविक घटना त्याच्यासाठी इतकी जबरदस्त होती की ते पाहून तो थक्क झाला. तो या घटनेबद्दल आधीच अध्याय 14 आणि 17 मध्ये बोलला होता आणि आता त्याने बाबेलचा क्रूर अंत पाहिला ज्यानी यरुशलेम आणि यहूदाच्या लोकांची सुमारे सत्तर वर्षे नाशधुस केली होती. या रात्री, पर्शियाचा राजा कोरेश याने मेजवाणीच्या खोलीत धमाका केला आणि या राज्याचा अंत केला.
लागूकरण:
बायबलमधील “भविष्यवाण्यांबदद्ल” इतके अद्वितीय काय आहे की ते प्रत्यक्षात दिसते. हे इतिहासात प्राचीन काळात घडले. जेव्हा कार, विमाने किंवा ट्रेन नव्हत्या. जेव्हा प्रिंटिंग प्रेस किंवा टेलिफोन किंवा टेलिव्हिजन किंवा कॉम्प्युटर चिप्सचा शोध लागला नव्हता. पृथ्वी कशी कार्य करते याचे कोणतेही खरे ज्ञान मनुष्याला नव्हते आणि विश्वाची नक्कीच काही समज नव्हती. पण यशयाला माहित होते की एक देव आहे ज्याने हे सर्व घडविले आहे आणि बाबेल काहीही असण्यापुर्वी बाबेलाच्या भविष्याकडे लक्ष देण्यास तो सक्षम आहे. हे लक्षात घेऊन, अमेरिकेतील 1822 वर्षाची कल्पना करण्याचा प्रयत्न करा, जेव्हा जेम्स मोनरो अध्यक्ष होते आणि त्यांनी अखेरीस अमेरिकन ध्वजात 24 वा तारा जोडला. त्यासमयी राज्यांमध्ये देवदार व्यापार हा मुख्य चिंतेचा विषय होता, त्या दिवसात एक संदेष्टा होण्याचा आणि मी या वर्ष २०२२ पर्यंत ज्या ज्या गोष्टीबद्दल लिहीत आहे त्या गोष्टींची कल्पना करण्याचा विचार करा. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप होती जी विश्वाची किनार पाहू शकत होती या गोष्टीच्याही आधी, आमचा देव त्या खेळाच्या खूप पुढे होता. मी मनुष्याच्या भविष्यवाणीवर अधिक विश्वास ठेवण्यापेक्षा पवित्रशास्त्रातील “भविष्यवाण्यांना” जास्त चिकटून राहीन. कारण त्या खऱ्या आहेत.
प्रार्थना:
प्रिय येशू,
तू नासाच्या खूप पुढे आहेस, तुला सर्व आधिपासूनच माहीत आहे. म्हणून मला तुझ्याबरोबर राहण्यास अनुग्रह दे. मी “भविष्यवाणी” वर विश्वास ठेवतो, ज्याने आम्ही जे ख्रिस्ती आहोत त्यांना दोन हजार वर्षांहून अधिक काळ प्रभूच्या कार्यावर तत्पर ठेवले आहे. इतरांना आमच्यावर हसू येत असेल. पण, तुझ्या “भविष्यवाणी” वर आधारित मी कुठे जात आहे हे मला माहीत आहे. कारण पृथ्वी नाहीशी होईल पण तुझे वचन सर्वकाळ टिकेल. जे तू सांगितले आहेस ते तू निश्चित पुर्ण करणार. येशुच्या नावात आमेन.