“भविष्याकडे धाव घेणे”

"भविष्याकडे धाव घेणे"

“भविष्याकडे धाव घेणे”

वचन:

ईयोब 8:21
तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जयजयकार करवील.

निरीक्षण:

ईयोबाच्या एका मित्राने, बिल्दादने त्याला त्याच्या आयुष्याच्या अगदी खालच्या टप्प्यावर असताना बोललेले हे शब्द होते. ईयोबाचे सर्व काही एका दिवसात नष्ट झाल्यामुळे, त्याच्या दहा मुलांसह, सर्व दुःखदपणे मृत्यु पावल्याने ईयोब खुप दु:खी झाला होता. सर्व आशा पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे, बिल्दादने ईयोबाला सांगितले की जो निर्दोष आहे त्याला देव नाकारत नाही आणि एके दिवशी तो (ईयोब) पुन्हा हसेल आणि आनंदाने जयघोष करेल.

लागूकरण:

तुम्ही तुमच्या जीवनात अशा ठिकाणी आलात जिथे आशेचे सर्व चिन्ह नाहीसे झाले असेल तेव्हा तुम्ही काय करता? तुमचा येशूवर दृढ विश्वास असल्यास, तुम्ही प्रभूकडून वचन येण्याची वाट पाहत राहता का? जेव्हा असे होते तेव्हा आपले मन काय विचार करते? नक्कीच अशी परीस्थीती फार भयानक आहे परंतू या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजते ती ही की “तुमच्या भविष्याकडे धावा.” अंधकाराच्या बाजूंवर कधीही विश्वास देऊ नका! एक विश्वासणारा म्हणून, नेहमीच आपल्याला एक आशा असते. जेव्हा मी खालच्या स्थितीत असतो, तेव्हा मी खरोखर खाली असतो; मी परमेश्वराचे वचन माझ्याकडे येण्याची वाट पाहतो. असे एखाद्या मित्राकडून किंवा मी एखाद्याला उपदेश करताना ऐकत असलेल्या संदेशावरून होऊ शकते. हे दृष्टांतात, किंवा स्वप्नात किंवा मी वाचत असलेल्या शास्त्रवचनात होऊ शकते, परंतु ते नेहमीच होते, प्रभू आपल्याशी नेहमीच संवाद साधतो त्याच्या वचनाद्वारे.  तेव्हा फक्त एक गोष्ट करायची आहे प्रभूचे वचन ऐकून “तुमच्या भविष्याकडे धावायचे!”

प्रार्थना:

प्रिय येशू,

या समयी, मला नेहमीपेक्षा जास्त वाटत आहे की, माझ्या परिस्थितीबद्दल तुझ्या वचनाची प्रतीक्षा करण्याची मला गरज आहे. मी ज्या गोष्टीतून जात आहे त्यामुळे फक्त तुच मला हवी असलेली आशा देऊ शकतोस. जेव्हा मी तुझे वचन ऐकतो तेव्हा मी “माझ्या भविष्याकडे धाव घेतो!” प्रभू माझ्याबरोबर सर्वकाळ असल्याबद्दल तुझे आभार. येशुच्या नावात आमेन.