मेंढीवर विश्वास ठेवतो

मेंढीवर विश्वास ठेवतो

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीही उणे पडणार नाही.

स्तोत्रकर्त्याने हे एक धाडसी विधान केले आहे: “मला काहीही उणे पडणार नाही.” हे विधान तुम्हीही करू शकता का? हे स्तोत्रे राजा दाविदाचे आहे, म्हणून आपण विचार करू शकतो, “राजाला काहीही कमी नाही असे म्हणणे सोपे आहे!” (दाविदाची कथा १ शमुवेल १६ – १ राजे २ मध्ये आढळते.) दाविद राजघराण्यात जन्मला नव्हता आणि त्याला कशाची ही खूप गरज पडायची. तो तरुण असताना मेंढपाळ असल्याने मेंढ्यांशीही परिचित होता. त्याला भटकणार मेढरु देखील समजत होत.

दावीद येथे पुरेशा वस्तूंबद्दल लिहित नाही. तो योग्य मार्गांवर मार्गदर्शन करण्यासाठी आणि वाटेत त्याची काळजी घेण्यासाठी परमेश्वरावर किती खोलवर विश्वास ठेवतो याची साक्ष देत आहे. मी कल्पना करतो की दाविद जेव्हा धोक्यात होता तेव्हा देवाने त्याला या गोष्टींची सर्वात जास्त गरज असताना त्याला मित्र, सहयोगी आणि आध्यात्मिक काळजी कशी दिली हे आठवत असेल. दाविदाचे जीवन धोक्यात असताना परमेश्वर त्या धोक्यातुन बाहेर काढायचा आणि नतंर पुढे दुसऱ्या माणसाची बायको चोरल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला तेव्हाही परमेश्वर त्या धोक्यातुन बाहेर काढले (२ शमुवेल ११-१२).

दाविद घोषित करतो की त्याचा मेंढपाळ परमेश्वर त्याच्या विश्वासाला पात्र आहे आणि तो हे धैर्याने करतो कारण परमेश्वराने त्याला कधीही निराश केले नाही.

चांगल्या मेंढपाळा, तुमच्या सततच्या, प्रेमळ काळजीबद्दल धन्यवाद. तुमच्या तरतूदीवरील विश्वासाची भावना माझ्यामध्ये अधिकाधिक वाढवा. येशुच्या नावात, आमेन.