वचन:
यहेज्केल 15:5
पाहा, ती शाबूत असता कसल्याही कामी पडत नाही, तर मग अग्नीने जळून तिचा कोळसा झाल्यावर ती कोणत्या कामी पडणार?
निरीक्षण:
येथे देवाने इस्राएलास निरुपयोगी द्राक्षलतेची उपमा दिली. तो म्हणाला आगीत जाळण्याआधीच लाकूड निरुपयोगी असते, आणि मग ते दोन्ही टोकाला जळाल्यानंतर आणि आगीमुळे मध्यभागापर्यंत जळून गेले तर ते कसे उपयोगी पडेल? “ते अजूनही निरुपयोगी आहे.” परमेश्वर यहेज्केलद्वारे बोलला आणि म्हणाला, “इस्राएल अग्नीतून बाहेर पडली आणि जिवंत राहीली तरी मी तिला शिक्षा करीन. आग लागण्यापूर्वी ती निरुपयोगी होतीच आणि “ती अजुनही निरुपयोगी आहे.”
लागूकरण:
आज मला एक सत्य सांगायचे आहे की आपल्यापैकी काहीजण कधीच शिकत नाही. तुम्हाला असे किती लोक माहित आहेत जे त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतात? इतिहासात या वेळी इस्राएलाची अशीच गोष्ट होती. लोक म्हणून तिच्या प्रवासात एक असा बिंदू आला जिथे तिच्यामध्ये एक राष्ट्र म्हणून पश्चात्ताप किंवा बदल दिसल नव्हता. ती आधी निरुपयोगी होती आणि आताही ती सर्व आगीच्या अनुभवातून गेली असता आणि जिवंत बाहेर आली असता तरी निरुपयोगी होती. “ती अजुनही निरुपयोगी होती.” परमेश्वराने या उताऱ्यात इस्राएलास बोलावले आणि तो आज आपल्याला बोलावत आहे. मला माहित आहे की माझ्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा माझी किंमत फारशी नव्हती. मी स्वतःसाठी जगण्याचे मौल्यवान दिवस वाया घालवले. परंतू, माझ्या आयुष्यात परमेश्वराच्या कृपेमुळे, मी “यापुढे निरुपयोगी नाही.” आज तुमच्याबद्दल काय? तुमच्याकडे सामायिक करण्यासाठी संदेश आहे किंवा तुम्ही अजूनही गोंधळात आहात? देव तुम्हाला अग्नीतून बाहेर काढण्याची इच्छा करतो, तो अजूनही जिवंत आहे आणि तुम्हाला हे जाणून घेण्यास मदत करतो की तुम्ही देखील “यापुढे निरुपयोगी नाही!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
माझ्याकडे भरपूर जीवन आहे आणि मी “यापुढे निरुपयोगी नाही!” याबद्दल तुझे आभार. मी सध्या माझ्या मित्रासाठी प्रार्थना करत आहे. त्यांनी एकही दिवस वाया घालवू नये यावर विश्वास ठेवण्यास मदत त्यांना मदत कर. खरं तर, आजही ते एक नवीन सुरुवात करू शकतात! कारण तू पुन्हा संधी देणारा प्रभू आहेस तु आम्हा सर्वांना तुझ्या कृपेत ठेव येशुच्या नावात आमेन.