येशू मला तुझी गरज आहे

येशू मला तुझी गरज आहे.

येशू मला तुझी गरज आहे

वचन:

स्तोत्र 63:1

हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.

निरीक्षण:

येथे दावीद राजाने देवाची त्याच्या जीवनात असलेल्या नितांत गरजेवर भर दिला. तो त्याच्या जीवनात असलेल्या देवाच्या गरजेला जणू एखाद्या वाळवंटात असल्यासारखे आणि कुठेही पाणी नसल्यासारखे वर्णन करतो. तो म्हणतो माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे! मी  – माझ्या संपूर्ण अस्तित्वात, माझ्या आयुष्यात तुझ्या उपस्थितीसाठी आतुर आहे. यावेळी तो त्याच्या शत्रूपासून पळत नव्हता म्हणून त्याला देवाची गरज भासावी; ही केवळ त्याची एक आंतरिक इच्छा होती जी दावीदाला सोडत नव्हती. “मला येशूची गरज आहे!” हे वाक्य अशा आपण प्रार्थना केलेल्या वेळेची आठवण करून देते.

लागूकरण :

आपल्याला वाटते की जीवनात बऱ्याच गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. त्या बाबतीत आपण सर्वच कदाचित सारखेच आहोत. आपण आपले मन एखाद्या गोष्टीकडे लावतो व म्हणतो की आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे. आपण काहीतरी पाहतो आपल्याला ते आवडते व आपण म्हणतो… “मला ते हवे आहे!” आणि मग, जर आपल्याला ते मिळाले, तर एक किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटांनंतर खरोखर त्या गोष्टीबद्दल समाधान वाटत नाही. मग आपण दुसर्‍याच गोष्टीकडे पाहतो. आपण सबब काढण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु यापैकी बरेच काही मानवी स्वभावाशी संबंधित आहे. काही काळापूर्वी, एक मनुष्य होता तो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता, तो त्याच्या भव्य विमानाचे फिरत असे त्याच्याकडे वैयक्तिक विमान होते पण तो आता त्यापेक्षा अधिक महागड्या गोष्टींकडे पाहत होता,  त्याच्या डोळ्यात बघून असे वाटत असे की तो आता पुढच्या गोष्टीचा विचार करत आहे. या गोष्टींमुळे त्याचे समाधान झाले नाही असे दिसते. वस्तुंबद्दल हे असेच आहे. परंतु, जेव्हा तुम्ही खरोखरच येशूच्या प्रेमाने आणि त्याने आपल्याला दिलेल्या तारणामुळे बदललेले असाल, तेव्हा तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये, तुम्ही रोज म्हणाल, “मला येशूची गरज आहे!”

प्रार्थना:

प्रिय येशू,

अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला वाटतात की त्या आमच्या जीवनात गरजेच्या आहेत, पण जरी त्या गोष्टी आमच्याकडे आल्या तरी त्या गोष्टींमध्ये आम्ही समाधान पावलो नाही किंवा आशिर्वादीत झालो नाही. परंतू या सर्व गोष्टींच्या वर प्रभू आम्हाला तुझी आज गरज आहे. जशी दाविदाच्या मनाला तुझ्या भेटीची आतुरता होती, तशी हे प्रभू आमच्या जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. म्हणून आम्ही म्हणत आहोत की आम्हाला सर्वदा, “येशू तुझी गरज आहे!” येशूच्या नावात आमेन.