“राष्ट्रीय पुढारी कसा दिसतो”

"राष्ट्रीय पुढारी कसा दिसतो"

“राष्ट्रीय पुढारी कसा दिसतो”

वचन:

स्तोत्र 72:4

तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणार्‍यांना चिरडून टाको.

निरीक्षण:

हा भाग दाविद राजाने परमेश्वर देव यास केलेल्या प्रार्थनेचा आहे. खरं तर, या प्रार्थनेत दाविदाने देवाला त्याच्या लोकांची योग्य काळजी घेण्यासाठी काही पुढाकार वृत्ती आणि सामर्थ्य देण्याची विनंती केली. या विशेष शास्त्रवचनांत दाविदाने तीन गोष्टी मागितल्या आहेत. प्रथम, त्याने मागितले की स्वत: असहाय्य आहेत अशा लोकांना सहाय्य करण्यासाठी देवाने त्यास सामर्थ्य द्वावे. मग त्याने मागितले की परमेश्वराने त्यास गरजवंतांच्या मुलांना वाचवण्यास सक्षम करावे. शेवटी, तो म्हणाला, “प्रभु, मला जुलूम करणार्‍यांस चिरडून टाकण्यास मदत कर.

लागूकरण:

जेव्हा तुम्ही हा संपूर्ण अध्याय वाचता तेव्हा तुम्ही स्वतःला विचार करताना पाहता की, “एक प्रेमळ राष्ट्रीय पुढारी असा दिसतो.” गंभीरपणे दाविदाच्या स्थितीत असलेल्या एका मनुष्याने देवाच्या लोकांसाठी आणखी काय मागावे. निःसंशयपणे, तो देवाचे हातपाय आणि त्याने सेवा केलेल्या लोकांसाठी पुरवठा होता. त्यामुळे साहजिकच, ही प्रार्थना येशूने केलेली प्रार्थना असावी असे वाटते. होय, हे खरे आहे की आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहोत जिथे नेतृत्व करणारे स्वतःसाठी काय लाभ मिळवू शकतो याकडे लक्ष देतात. राजकारण करतात आणि त्यात फसल्या जातो सामान्य नागरिक. जगातील बहुतेक राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आम्हाला मिळालेल्या नेतृत्वाचे आम्ही कौतुक करत असल्यासारखे वागणे ही लाजिरवाणी आणि कार्य करण्यास लाज वाटणारी गोष्ट आहे. परंतु तुम्हाला “राष्ट्रीय पुढारी कसा दिसतो” हे जाणून घ्यायचे असल्यास, हा संपूर्ण अध्याय वाचा.

प्रार्थना:

प्रिय येशू,

एका राष्ट्रीय राजकीय पुढाऱ्यापेक्षा, तू मला खूप वरच्या पाचारणासाठी बोलावले आहे. मी आज ज्यांनी आपला मार्ग गमावला आहे त्यांच्यासाठी या जगातील राष्ट्रांच्या नेतृत्वाची मागणी करतो. प्रभु, धैर्य जागृत कर, जे लोक तुझे भय धरून कार्य करत नाही त्यांना तुझ्या भयाची जाणीव करून दे. त्यांना कळावे की प्रत्येक निवड ही परमेश्वरापासून आहे. राष्ट्रासाठी इमानदारीने, निष्ठेने आणि निस्वार्थपणे कार्य करण्यास सर्व पुढाऱ्यांना सहाय्य कर. मी प्रार्थना करतो की त्यांनी योग्य ते करावे. येशूच्या नावात आमेन.