व-चन:
गलती 6:1
बंधूंनो आणि बहिणींनो, जर कोणी पापात अडकला असेल, तर तुम्ही जे आत्म्याने जगत आहा त्या व्यक्तीला सौम्य भावाने ताळ्यावर आणावे, परंतु तुमचीही परीक्षा होऊ नये म्हणून स्वत: सांभाळा.
नि-रीक्षण:
संत पौलाने गलती येथील मंडळीला पत्र लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा, त्याला त्या विश्वासणाऱ्यांबद्दल काळजी होती जे काही प्रकारच्या पापात गुंतलेले आढळले. पौलाने सांगितले की जे आत्म्याने जगतात त्यांनी “त्यांना ताळ्यावर आणावे.” आणि तो म्हणाला की ते सौम्यतेने करा, परंतु ताळ्यावर आणणारा त्याच परीक्षेत पडू नये याची काळजी घ्या.
ला-गूककरण:
मला हे वचन आवडते. स्वत:ला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणवणाऱ्या काहीं लोकांना एखादा भाऊ किंवा बहीण पतन पावल्यावर आनंदी असल्याचे तुम्ही किती वेळा पाहिले आहे? पण तो खरा ख्रिस्ती असण्याचा प्रतिसाद नाही. नेहमी! प्रेषित आम्हाला सांगतो की जेव्हा एखादा भाऊ किंवा बहीण पाप करतो तेव्हा येशूमधील आध्यात्मिक स्वास्थ आणि जीवन आणून “त्यांना पुर्नस्थापित करण्यास” सौम्य भावाने मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. जणू काही मोठी गोष्ट नाही असे म्हणावे तसे आम्ही हे हलक्यारीतीने करत नाही,! त्याऐवजी, आम्ही चूक मान्य करतो परंतु “त्यांना पुर्नस्थापित करण्यासाठी” आणि जो कोणी पडला आहे, येशूमध्ये पुन्हा जीवन आणि स्वास्थ मिळवण्यासाठी आपल्या प्रभूची कृपा स्वीकारण्यास तत्पर आहोत. भाऊ व बहिण या नात्याने आमचा मुख्य उद्देश एखाद्या पडलेल्या बंधू किंवा बहिणीवर प्रेम करणे, त्यांचा स्वीकार करणे आणि क्षमा करणे आणि “त्यांना पुर्नस्थापित करणे!” हा आहे
प्रा-र्थना:
प्रिय येशू,
आज कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त, जे मार्ग सोडून भटकले आहेत त्यांना ताळ्यावर आणणारा होण्यासाठी तू मला मदत कर अशी मी तुला विनंती करत आहे! हे प्रभू, “त्या प्रियजनांना पुर्नस्थापित करण्यास” त्यांना प्रभूच्या वचनाद्वारे मार्गदर्शन करण्यास आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास मला मदत कर. येशूच्या नावात आमेन.