वचन:
उत्पत्ती 15:6
अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला.
निरीक्षण:
अब्रामाला मुलगा नव्हता, पण त्याला देवाकडून वचन मिळाले होते की त्याची संतती आकाशातील ताऱ्यांच्या संख्येइतकी होईल. जेव्हा त्याने त्या वचनावर विश्वास ठेवला तेव्हा देव म्हणाला अब्राम एक नीतिमान मनुष्य आहे. “विश्वास = नितीमत्व.”
लागूकरण:
उत्पत्तिमधील हा उतारा संपूर्ण बायबलमध्ये पुनरावृत्ती आहे. स्तोत्रे, रोमकरांस पत्र, गलतीकरांस पत्र, इब्रीलोकांस पत्र आणि याकोब हे सर्व या उताऱ्याचा संदर्भ देतात. जेव्हा एखादा पुरुष किंवा स्त्री देवावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा देव ताबडतोब त्यांच्या जमेश नितीमत्व गणतो. होय, ही “येशूचा अनुयायी” म्हणून वाढत्या परिपक्वतेची केवळ सुरुवात आहे, तरीही हे खरे आहे की देवावरील तात्काळ विश्वासाचा परिणाम म्हणजे देवाकडून तात्काळ धार्मिकता प्राप्त होणे. आपण किती करतो इतके नाही, तर आपण कोणावर विश्वास ठेवतो हे जास्त आहे. नोहाचा देवावर विश्वास होता, आणि त्यामुळे त्याला देवाकडून कृपा मिळाली, परंतु कदाचित अब्राहाम हा देवाकडून मिळालेल्या “अभिवचनावर” विश्वास ठेवणारा प्रथम होता. देवाने त्याला सार्वकालिक करार म्हटले आणि अब्राहामाने विश्वास ठेवला. नितीमत्व नेहमी विश्वासाद्वारे प्राप्त होते ज्याप्रकारे अब्राहामाने देवावर शक्यता नसताना देखील विश्वास ठेवला तेच त्याच्याठायी नितीमत्व असे गणण्यात आले. “विश्वास = नितीमत्व.”
प्रार्थना:
प्रिय येशू,
आज मी शिकलो आहे की धार्मिकतेपूर्वी प्रथम विश्वास असणे आवश्यक आहे. होय माझा तुझ्यावर विश्वास आहे! येशुच्या नावात आमेन.