वचन:
मत्तय 8:8
तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
निरीक्षण:
ही रोमी सैनिकाची कथा आहे जो एक विधर्मी होता तरी ही देवभीरू मनुष्य होता. तो येशूकडे आला आणि म्हणाला, “माझ्या घरी एक चाकर आहे जो अत्यंत आजारी आहे. येशू म्हणाला मी तुझ्या घरी यावे, हे तुला आवडेल का? तो मनुष्य म्हणाला“, शब्द मात्र बोला. कारण मी अधिकाराच्या अधीन आहे आणि माझेही लोक माझ्या अधिकाराखाली आहेत आणि मी त्यांना काहीतरी करण्यास सांगितले तर ते तसेच करतात. तुम्हांला माझ्या घरी येण्याची गरज नाही. कारण मला माहीत आहे, की जर तुम्ही शब्द मात्र बोलले तर तो बरा होईल. मग येशू शब्द बोलला आणि त्याचा चाकर बरा झाला.
लागूकरण:
येशूने प्रथम त्या मनुष्याला उत्तर दिले की, “मी सर्व इस्राएलामध्ये असा विश्वास पाहिला नाही.” ही कथा फारच सुंदर आहे, एक वेळ आहे जिथे येशूने खऱ्या विश्वासाला प्रतिसाद दिला. शुभवर्तमानांची कथा ही दर्शनी मुल्य स्वीकारणारी एक कठीण गोष्ट आहे. विश्वासाच्याद्वारे प्राप्त होणारा एकच मार्ग आहे. म्हणून जर तुम्ही किंवा कोणत्याही व्यक्तीने येशू जो प्रभु आहे त्यावर विश्वास ठेवण्याचे ठरविले आणि खरोखरच असे म्हटले की, “सर्व विपरीत गोष्टी सोडून या सत्यावर माझा विश्वास आहे.” तर आपण या रोमी शताधिपतीप्रमाणे ख्रिस्ताचा अनुयायी होऊ शकतो, आम्ही येशूला म्हणू शकतो की,”शब्द मात्र बोला, म्हणजे माझे मूल किंवा माझा जोडीदार, किंवा माझे वडील किंवा आई बरे होतील.” येशू काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे, म्हणून कोणत्याही क्षणी, तुम्ही त्याला “शब्द मात्र बोला” असे म्हणू शकता.
प्रार्थना:
प्रिय येशु,
आज मी धन्य व्यक्ती आहे की माझा प्रभु तू आहेस. या वर्तमान काळात आजही तू लोकांना त्यांच्या संकटातून, आजारातून आणि सर्व त्रासातून वाचवितोस, बरे करतोस, आणि आमचा पुरवठा करतोस, या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. पूर्वीपेक्षा जास्त, येशू, आम्ही तुला एवढेच म्हणतो की “शब्द मात्र बोल!” मला खरोखर एवढीच गरज आहे. येशुच्या नावात आमेन.