वचन:
स्तोत्र 140:12
परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे.
निरीक्षण:
इस्त्राएलाच्या इतिहासातील सर्वांत महान राजा दावीद पुन्हा एकदा, “समर्थन” या शब्दास घेऊन येतो. तो देवाच्या मनासारखा मनुष्य होता. दाविदाप्रमाणे कोणत्याही राजाने देवाच्या प्रेमाची कदर केली नाही, या राजाला होती तेवढी कोणत्याही राजाला देवाच्या सान्निध्यात राहण्याची इच्छा नव्हती. राजा दावीदासारखा “समर्थन” या शब्दाबद्दल कोणत्याही इस्राएली राजाने कधीही विचार केला नाही.
लागूकरण:
गरीब आणि गरजू लोकांवर अन्याय होतो या गोष्टीचा दावीद राजाला तिरस्कार वाटत असे. त्याच्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला अत्यंत निष्पक्षतेने वागवले जाणे हे त्याच्या मनाला खुप प्रिय होते. जेव्हा जेव्हा त्याला अन्याय दिसला तेव्हा तेव्हा तो त्याविषयी बोलला आणि सर्व निट करण्यासाठी कार्यवाही केली. इतिहासात महान राष्ट्रे आपल्या सर्व घटकांची काळजी घेत असे; तथापि, पैसा आणि सत्तेप्रति त्यांचे प्रेम जसजसे वाढत गेले, तसतसे पुढाऱ्यांची आपल्या लोकांसाठी असलेली काळजी कमी होत गेली आणि कालांतराने हे राष्ट्र कमकुवत झाले आणि बहुतेक प्रकरणांमध्ये त्याचा नाश झाला. पण दाविदासोबत तसे कधीच झाले नाही. लोकांवरील त्याचे प्रेम हा त्याच्या कारकिर्दीचा समान धागा होता. जेव्हा जेव्हा त्याला वाटत असे की एखाद्यावर अन्याय होत आहे, तेव्हा तेव्हा तो पुन्हा “समर्थन” या शब्दाचा उल्लेख करत असे. ही वेळ आली आहे की आपण आपल्या शहरांमध्ये आणि राष्ट्रांमधील न्यायासाठी अधिकाधिक चिंतित व्हावे, कारण आम्ही जगभरातील प्रेमळ अधिकार नष्ट होत असल्याचे पाहतो.
प्रार्थना:
प्रिय येशू,
मी चिंतित आहे की माझ्या स्वतःच्या समुदायामध्ये, मी असे बरेच लोक पाहतो ज्यांना खरा न्याय मिळत नाही. मला माझ्या पध्दतीने पुढारी होण्यास सहाय्य कर, जो त्या विषयावर आवाज उचलतो आणि त्यास पूर्ववत करण्यासाठी कार्य करतो. प्रभू मला तुझ्या ज्ञानाने भर आणि एक चांगला पुढारी म्हणून काम करण्यास मला शक्ती आणि सामर्थ्य दे, येशुच्या नावात आमेन