व-चन:
यहोशवा 1:8
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहीले आहे ते तू काळजीपुर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल.
नि-रीक्षण:
मोशेच्या मृत्यूनंतर इस्राएलाचा नवीन पुढारी यहोशवा यास प्राप्त झालेली ही सर्वशक्तिमान देवाची वचने होती. थोडक्यात, देवाने यहोशवास वचन बोलण्यास, वचनाचा विचार करण्यास आणि दररोज वचनाप्रमाणे करण्यास सांगितले. जर त्याने असे केले तर देव त्याला “समृद्ध व यशस्वी” बनवेल.”
ला-गूकरण:
बायबलमध्ये हे एकमेव ठिकाण आहे जिथे समृद्धी आणि यशस्वी याबद्दल एकत्र नमूद केले आहे. हे अगदी स्पष्ट आहे की देवाची आपल्या लोकांप्रती हीच इच्छा आहे. अनेक ख्रिस्ती लोकांना देवाची मुले समृद्ध आणि यशस्वी व्हावीत याबद्दल असलेल्या देवाच्या कल्पनेला नाकारताना मी ऐकले आहे, परंतु माझा विश्वास आहे की आपण प्रत्येक जागेवर या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे अशी देवाची इच्छा नाही. त्याऐवजी, देवाची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी देवाचे वचन बोलून, देवाच्या वचनाचा विचार करून आणि दररोज देवाच्या वचनाप्रमाणे करून समृद्ध आणि यशस्वी व्हावे. जेव्हा आपण त्रिगुणात्मक तत्त्वाचे पालन करू तेव्हा आपण “समृद्ध आणि यशस्वी होऊ.”
प्रा-र्थना:
प्रिय येशू,
या आमच्या जीवनात मी आणि माझे कुटुंब “समृद्ध आणि यशस्वी” आहोत याबद्दल तुझे आभार. आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही आर्थिक गोष्टी हाताळत असताना आम्हाला अडचणी येतात परंतू तू आमचा पुरवठा होतोस म्हणून तुला धन्यवाद, तुझे वचन आमच्या जीवनात कबूल करण्यास, त्याबद्दल विचार करण्यास आणि त्याप्रमाणे रोज जीवन जगण्यास आम्हाला मदत कर, कारण तुझी इच्छा आहे की आम्ही समृध्द आणि यशस्वी व्हावे आणि यश केवळ तुच देऊ शकतोस म्हणून तुझ्याशी विश्वासू राहण्यास आम्हाला मदत कर आतापर्यंत आमचा पुरवाठा केल्याबद्दल तुझे आभार, येशूच्या नावात, आमेन.