“सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”!

“सरळ असलेल्यास त्याचे दर्शन होईल”!

“सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”!

वचन:

स्तोत्र 11:7

कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे; सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल.

निरीक्षण:

स्तोत्रकर्ता आपल्या महान देवाबद्दल एक अद्भुत विधान करतो. त्याने जे सांगितले त्याबद्दल काही शंका नाही, आणि खरोखर ही “तीन चिन्हे” आहेत जी आपल्या प्रेमळ तारणाऱ्याकडे आहेत. प्रथम, आपला देव नीतिमान आहे! दुसरे, आपल्या देवाला न्याय आवडतो! आणि तिसरे, “सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”!

लागूकरण:

ज्या देवाची आपण सेवा करतो त्याच्याशी अनेक चिन्हे जोडलेली आहेत. तरीही, आज आम्ही फक्त तीन चिन्हांना अधोरेखित करत आहोत. तरी या तिन चिन्हांचा विचार करा. तुम्हाला नीतिमान देव नको आहे का? म्हणजे, गंभीरपणे. जर आमचा देव स्वैराचारपणाने आणि पूर्ण भ्रष्टतेने जीवन जगणे याची प्रशंसा करत असेल तर आम्ही काय करावे? जर हत्येला प्रोत्साहन दिले गेले आणि विवाहाला अधोगती दिली गेली तर? थांबा हे आपण राहत असलेल्या देशाप्रमाणे वाटते ना. आपला देव, यहोवा, यास न्याय प्रिय आहे! पण आपण सर्वत्र काय पाहतो? न्यायाचे संपूर्ण खंडन. दुर्बळता आणि मौन हा आजचा जीवन क्रम आहे असे दिसते. लोक त्यांच्या घरात लपलेले आढळतात आणि देशातील अन्यायाचा निषेध करण्याची हिम्मत फार कमी लोकांमध्ये असते! देवाने नीतिमानांसाठी जे ठरवले आहे त्याबद्दल आपण खरोखर उत्साहित आहोत. तो म्हणतो की आपण त्याला समोरासमोर पाहू! आपण जे प्रभूवर विश्वास ठेवतो ते त्याची वाट पाहत आहे पण बाकीचे जग विसरले आहे की ते त्याला समोरासमोर पाहतील? हे आपल्या देवाच्या “तीन चिन्ह” याबद्दल आहे. परंतु प्रत्येक “” चिन्हांसह, एक “-” चिन्ह देखील येते. देवाच्या “+” बाजूने जाण्याची वेळ आली आहे. वेळ व्यर्थ घालवू नका. तो लवकरच येत आहे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

ज्या गोष्टींना तू प्रोत्साहीत करत आहेस त्या गोष्टींसाठी मला जगायचे आहे. मला माहित आहे की माझ्या आत्म्याचा शत्रू दररोज प्रोत्साहन देतो अशी अनेक आव्हाने आहेत, परंतु त्याला पराभूत करायचे आहे मुळात तो आधीच पराभूत झालेला आहे. म्हणूनच मी तुझ्या बाजूने आहे. प्रभू तुला जसे पाहिजे तसे कर, मी तयार आहे. येशूच्या नावात आमेन.