“हायहाय! माझे आता वाईट झाले,

"हाय हाय आता माझे वाईट झाले!"

“हायहाय! माझे आता वाईट झाले,

वचन:

यशया 6:5
तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”

निरीक्षण:

बहुधा, यशयाला प्रभूचा दृष्टान्त होण्याआधी आणि उंचावर येण्याआधी, त्याला स्वतःबद्दल खूप चांगले वाटले असावे. तो इस्राएलाचा संदेष्टा होता आणि त्याच्या लोकांविरुद्ध परमेश्वराकडून त्याला आधीच भरगच्च आरोप प्राप्त झाले. पण नंतर यशयाने सांगितले की त्याला परमेश्वराचा दृष्टान्त झाला आणि तो उंचलण्यात आला. एकदा त्याने परमेश्वराचा दृष्टांत पाहिला, तेव्हा त्याला लगेच असे वाटले की त्याच्या धार्मिकतेत तीव्र कमतरता आहे. तुटलेल्या अवस्थेत, त्याने देवाचा धावा केला आणि म्हणाला, “हाय हाय आता माझे वाईट झाले!” त्याच्या स्वत:च्या वैयक्तिक आध्यात्मिक स्थितीची ही निराशाजनक आणि दुःखदायक कबुली होती.

लागूकरण:

माझ्या प्रौढ आयुष्यातील प्रत्येक वर्षी, मी हा उतारा अनेक वेळा वाचला आहे. आज सकाळी माझ्यात काहीतरी प्रज्वलित झाले आणि ते असे होते, “हाय हाय पुन्हा वाईट होईल!” जर आपण सावधगिरी बाळगली नाही, त्यामुळे बर्‍याचदा असे वाटते की, आयुष्य खूप चांगले चालले आहे, आणि कुटुंब व्यवस्थित आहे, आणि तुमच्यावर प्रेम करणारे मित्र तुमच्या जवळ असल्यावर तुम्हाला धन्यता वाटते. या सर्वांच्या मध्यभागी एक सूक्ष्म शब्द आहे जो तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, “तुम्ही खूप चांगले करत आहात!” आणि तुम्ही चांगले आहात, पण तेथे एक सत्य आहे.  जेव्हा जेव्हा प्रार्थनेत, आपण खरोखरच परमेश्वराला उच्च आणि सर्वश्रेष्ठ ठिकाणी पाहतो, मला असे म्हणायचे आहे की आपण त्याला त्याच्या वैभवात आणि गौरवात आणि पवित्रतेमध्ये खरोखर पाहतो, त्या क्षणी आपण त्या तुलनेत उभे राहावे असा कोणताही मार्ग नाही. कारण माझ्या मित्रांनो, तो “प्रेमळ आहे! आणि मी तसा नाही! आणि म्हणून या समयी, माझ्या डोळ्यांत अश्रू घेऊन, मी म्हणतो, “हाय हाय, पुन्हा वाईट होईल.”

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी याआधी येथे प्रार्थना केली आहे आणि मी पुन्हा प्रार्थना करीत आहे.  तुझ्यासारखं होणं, तुझ्यासारखं होणं. धन्य उद्धारका, तू जसा शुद्ध आहेस, तुझ्या चागूलणात येणे, तुझ्या पूर्णत्वात येणे किती आनंददायक आहे. माझ्या हृदयावर तुझी स्वतःची प्रतिमा खोलवर पडू दे. येशुच्या नावात आमेन.