“तू मला ओळखतोस”

"तू मला ओळखतोस"

“तू मला ओळखतोस”

वचन:

स्तोत्र 139:1
हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.

निरिक्षण:

दावीद राजाच्या राज्यात फक्त प्रजा होती. त्याने सर्वशक्तिमान देवाशिवाय कोणालाच नमन केले नाही. तो त्याच्या स्वर्गीय पित्याविषयी इतका आश्चर्यचकित झाला की त्याने सतत त्याची स्तुती केली आणि अशा शब्दांत त्याची उपासना केली ज्याचा आपल्यापैकी बरेच जण क्वचितच विचार करतात. या उतार्‍यात, तो त्यास आपल्या आकलनाच्या पातळीवर आणतो आणि म्हणतो, “तू मला ओळखतोस.”

लागूकरण:

जेव्हा आपण एका देशात राहतो, तेव्हा आपली ओळख ही एका नंबर द्वारे तयार होते, जसे आधार नंबर, मतदान नंबर. जेव्हा आपण कोठे नोकरीसाठी मुलाखतीला जातो तेव्हा आपली सर्व तपशीलवार माहीती घेतली जाते, आपली राष्ट्रीय ओळख पाहीली जाते. म्हणायचे झाले तर आपण एक संख्या बनून जातो, जी संख्या आपली ओळख दर्शविते. आपल्या क्रेडिट हिस्ट्री आणि स्कोअरच्या बाबतीतही हेच आहे. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना माझ्याविषयी जाणने गरजेचे नाही तर त्यांना केवळ माझा नंबर आवश्यक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, फार कमी लोक आपल्याला ओळखत असतात. आपले कुटुंब आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखते, परंतु ते देखील आपल्याला पूर्णपणे ओळखत नसतात. परंतू आपण येशू ख्रिस्तासाठी पूर्णपणे वचनबद्ध असावे याचे कारण, “तो मला ओळखतो!” तो तुम्हांलाही ओळखतो!

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी तुला काहीही विचारण्यापूर्वी, तुला आधीच सर्व माहित आहे की मला कशाची गरज आहे, आणि मी काय मागणार आहे. मी क्षमा मागण्यापूर्वी, मी काय केले आहे आणि मला कशासाठी पश्चात्ताप करणे आवश्यक आहे हे तुला आधीच माहित आहे. मी कधीही करू शकत नाही किंवा तुला आधीच माहित नाही असे काहीही नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो कारण “तू मला ओळखतोस!” येशूच्या नावात आमेन.