वचन:
1 इतिहास 18:14
दाविदाने सर्व इस्त्राएलावर राज्य केले’ तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे.
निरीक्षण:
हा उतारा इस्राएलाचा राजा म्हणून दाविदाच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंतच्या वाटचालीला सुरुवात करतो. या वचनात, आपल्याला सांगितले आहे की दावीद (त्या वेळी) महान लोकांच्या विशाल राष्ट्रावर न्याय आणि नीतीने राज्य करू शकला. आणि जेव्हा तुम्ही हे वाचता, जर तुम्हालाही तसे करू वाटत असेल तर तुम्ही म्हणू शकता, “मला ते करायचे आहे!” याचा अर्थ असा नाही की दाविद राजा व्हायचे आहे किंवा मोठ्या राष्ट्राचे नेतृत्व करायचे आहे. नाही असा त्याचा अर्थ नाही, परंतू अशी व्यक्ती होणे नक्कीच चांगले जी म्हणेल. मला न्याय आणि नीतीने नेतृत्व करायचे आहे.
लागूकरण:
प्रत्येकजण कोणाचे तरी नेतृत्व करत असतो. तुम्हाला वाटत नसतानाही तुम्ही तसे करता! एकदा एक व्यक्ती रात्री विमानतळावरून टॅक्सी घेऊन घरी येण्यास निघाला, उबर टॅक्सीला येण्यास खुप उशीर झाला होता. परंतू त्या व्यक्तीला त्या टॅक्सीची गरज होती, तो त्यामध्ये बसला आणि टॅक्सी चालक त्याला घरी घेऊन जात होता, तो त्याचे नेतृत्व करत होता. कदाचित तुम्ही अशी आई असाल जी वडीलांशिवाय आपल्या मुलांना सांभाळत असेल तर तुम्ही आपल्या लेकरांचे नेतृत्व करत आहात. तुम्ही शिक्षक असाल आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देत असाल तर तुम्ही ज्ञानासाठी त्यांचे नेतृत्व करत आहात. हे सर्व नेतृत्व आहे. तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर असा किंवा एकटी आई असा तुम्हाला काय करायचे आहे? कोणत्याही परिस्थितीत, न्याय आणि नीतिने नेतृत्व करायचे आहे. हे जग अधिकच अव्यवस्थित होत चालले आहे; तथापि, जेव्हा आपण या सर्व दैनंदिन जीवनात अडकलेले असतो, तेव्हा न्याय आणि नीतिने एकमेकांसोबत जगत असता आपले कार्य करणे गरजेचे आहे आणि असे म्हणणे गरजेचे आहे की. “मला ते करायचे आहे!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
दाविद राजाच्या उदाहरणाबद्दल तुला धन्यवाद, ज्याने 40 वर्षे न्याय आणि नीतिने नेतृत्व केले. “मला ते करायचे आहे,” परंतू देवा आम्ही या गोष्टीत कमी पडतो, म्हणून मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे, येशू, आम्हास मला मदत कर, येशुच्या नावात आमेन.