“आपली प्रतीती पाहा!”

“आपली प्रतीती पाहा!”

“आपली प्रतीती पाहा!”

वचन:

2 करिंथ 13:5

तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही.

निरीक्षण:

येथे प्रेषित पौल करिंथ येथील मंडळीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा शेवट करतो, आणि ते प्रत्येकजण आध्यात्मिकरित्या कोठे आहे याची वैयक्तिक परीक्षा घेण्याबद्दल  त्यांना लिहितो! ते विश्वासाने खंबीरपणे उभे आहेत की नाही हे त्यांना त्यांना परीक्षेत उतरल्यावर समजते. पौल म्हणाला की जेव्हा त्यांना समजेल की ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना विश्वासात जगण्यासाठी तो सामर्थ्य देतो तेव्हा ते उत्तीर्ण होतील. अर्थातच, पौल म्हणाला, “तुम्ही पंसतीत उतरलेले नाही.”

लागूकरण:

तुम्ही किती वेळा अध्यात्मिक EKG केला आहे. तुम्ही केवळ “येशूचे अनुयायी” होण्याच्या हालचालीतून जात आहात काय? ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला मोहात पाडते. आम्हाला हा भाग जगण्याचा मोह होतो परंतु खरोखरच येशू आपल्या अंतःकरणात पूर्णपणे सामावलेला नसतो जेणेकरून कोणत्याही आव्हानात तो आपल्यातून बाहेर यावा. त्याचे चारित्र्य, सात्विकता, प्रेम, सौम्यता, उदारता आणि इतरांना स्वतःच्या पुढे ठेवणे हे आपल्यामध्ये राहणाऱ्या येशूचे गुण आहेत. आपण आपल्या जीवनात केवळ एका रुढी परंपरेनुसार चालणारे बनतो, येशूला आपल्या जीवनात पुर्णत: स्विकारत नाही त्याचे गूण स्विकारत नाही आणि म्हणून आपण पंसतीत उतरत नाही. तुम्ही विचार करत असाल की आज तुम्ही परीक्षा दिली तर पास व्हाल का? हे शोधण्याचा एकच मार्ग आहे.  “आपली प्रतीती पाहा!”

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी “स्वत:ची प्रतीती पाहत आहे. देवा, मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की माझ्यातून निघणारी गोष्ट एक धर्म नसावा, तर माझ्यामधून तू यावास जो माझ्यामध्ये राहतो, मला चालवितो, मला मार्गदर्शन करतो, जो माझ्या जिवनाचा प्रभू आहे, जो माझ्या विचारांवर व कृतीवर संपुर्ण लक्ष ठेवतो. प्रभू माझ्या जीवनातून तुझा गौरव होऊ दे, माझ्या जीवनातून केवळ तूच दिसून येऊ दे. म्हणून माझी प्रतीती पाहण्यास मला सहाय्य कर, येशूच्या नावात. आमेन.