वचन:
2 करिंथ 11:14
ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.
निरीक्षण:
प्रेषित पौलाने या अध्यायाचा उपयोग खोटे शिक्षण आणि सुवार्तेच्या शिक्षकांच्या कार्याचा निषेध करण्यासाठी केला होता. त्याने करिंथ येथील मंडळीला सांगितले की तो आणि त्याचे सहकारी कधीही पगारासाठी त्यांच्या शहरात आले नाहीत तर केवळ येशूची सुवार्ता सांगण्यासाठी आले. तो त्यांना म्हणाला की त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुवार्तेचे सत्य मांडले आहे. पण आता या इतर भोंदूंचे ऐकून त्यांची फसवणूक होत आहे. पौल म्हणाला, “पण असे नक्कीच घडले आहे. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” तर येथे, शत्रूचे खोटे शिक्षण, जो त्यांचा स्वामी सैतान करतो तसे करण्यास सांगत आहे. म्हणून हा प्रश्न विचारला जातो, “तुम्हाला कोण फसवत आहे?”
लागूकरण:
पवित्रशास्त्राच्या- कृपेने भरलेले ख्रिस्ती म्हणून विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला वाढवले गेले आहे यावर विश्वास ठेवण्यापासून मागे फिरविण्यास शत्रूला कधीही तुम्हास फसवू देऊ नका. जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिसतात ज्या सामान्य नसतात आणि पवित्रशास्त्रावर आधारित नसतात, तेव्हा फसू नका. तुमच्या क्षेत्रातील सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एखादी नवीन गोष्ट तुम्ही किती वेळा ऐकली असेल? पण काही वर्षांनंतर, ती ऐकलेली मोठी नवीन गोष्ट आम्ही कोसळून पडली आहे, तिचा नाश झाला आहे असे ऐकतो? असे बहूदा होते. प्रभूच्या कार्यात त्वरीत वाढ झालेल्या बहुतेक गोष्टींना दीर्घकाळापर्यंत आपली असामान्य वाढ टिकवून ठेवता येत नाही. प्रेषित पौलाचे कलस्सैकरांस म्हटलेले हे शब्द येथे योग्य आहेत. “म्हणून, ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्त येशूला प्रभू म्हणून स्वीकारले, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपले जीवन जगा, त्याच्यामध्ये रुजले आणि बांधले जा, तुम्हाला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ व्हा, आणि कृतज्ञतेने भरून जा. (कलस्सै. 2:6-8) आणि लक्षात ठेवा, फसू नका!
प्रार्थना:
प्रिय येशू.
मी आभार मानतो की माझ्या संगोपणामध्ये मला वचनाच्या दृष्टीने सरळ आणि अरुंद असे ठेवले आणि मला फसवणूक होण्यापासून दूर राहण्यास मदत केली. प्रभु, चांगल्या आणि ठोस पवित्रशास्त्राच्या शिक्षणाबद्दल तुझे आभार. मी त्यावर काम करत असताना, मला तुझ्यामध्ये रुजलेले जाण्यास आणि वचनावर आधारीत राहण्यास सहाय्य कर! येशुच्या नावात आमेन.