वचन:
नीतिसुत्रे 14:31
जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
निरीक्षण:
येथे सुज्ञ अगदी थेटपणे आपल्याला आठवण करून देतो की जो कोणी अत्याचार करतो किंवा त्रास देतो किंवा गरीब आणि गरजू पुरुष किंवा स्त्रीला तुच्छतेने पाहतो तो सर्वशक्तिमान देवाच्या समोर आपली हात हलवितो याप्रमाणे आहे! दुसरीकडे, राजा शलमोन आपल्याला सांगतो की आपण आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करावा.
लागूकरण:
जेव्हा आपण हा उतारा वाचतो तेव्हा आपण ठरवितो की मी आपले आयुष्य गरजूंना मदत करण्यासाठी घालवावे. आपण एक चांगले व्यक्ती आहोत असे नाही, परंतु किमान आपल्याला या वचनातून उद्देश सापडतो म्हणून. ज्यांच्याकडे प्रचंड संसाधने आहेत त्यांना कोणीही मदत करते आणि जेव्हा ते करतात तेव्हा तो व्यक्ती आपल्यासाठी काही तरी करील यासाठी त्याला मदत म्हणून पाहिले जाते. परंतू असे लोक ज्यांच्याकडून कशाचीही अपेक्षा नसते म्हणजे आपल्या मदतीला परतफेड म्हणून काहीच करू शकत नाही त्यांना मदत करणे देवाला सन्मान देणारे आहे. निस्वार्थ दया करा, उसने द्या, अपेक्षा करू नका की त्याने तुम्हास ते परत द्यावे तर उदार मनाने मदत करा कारण तुमचे प्रतिफळ स्वर्गात आहे.
प्रार्थना:
प्रिय येशू,
तू माझ्यावर केलेल्या तुझे दयेबद्दल धन्यवाद. प्रभू तू मला सक्षम केले की मी इतरांना मदत करू शकेल. तुझे वचन सांगत की जो गरजवंतावर दया करतो तो देवाचा सन्मान करतो. प्रभू या समयी मला तुझ्या सामर्थ्याने उभे कर की इतरांवर जशी तू माझ्यावर केलीस तशी दया करावी आणि इतरांच्या गरजा जाणून घ्यावा. प्रभू मला सहाय कर. येशूच्या नावात आमेन.